Indian Company Not Buy Crude Oil From America : भारतातील प्रमुख तेल कंपन्यांनी अलीकडे अमेरिकेतून येणाऱ्या क्रूड ऑइलकडे पाठ फिरवली आहे. यामागचं मोठं कारण म्हणजे त्याचा वाढलेला खर्च. जरी ब्रेंट आणि डब्ल्यूटीआय (WTI) क्रूडमध्ये साधारण 4 डॉलर प्रति बॅरल एवढाच फरक असला, तरी अमेरिकन तेल भारतापर्यंत पोहोचवताना वाहतूक आणि इतर खर्च खूप वाढतो. त्याच्या तुलनेत आफ्रिका आणि खाडी देशांतून मिळणारं तेल खूपच परवडतं ठरतं.
अमेरिकन (America) तेल खरेदीचं (Crude Oil) महत्त्व केवळ खर्चापुरतं मर्यादित नाही. व्यापार संतुलन राखण्याचं काम देखील ते करत होतं. कारण अलीकडेच अमेरिकेने भारताकडून होणाऱ्या आयातीवरचा टॅरिफ (Tariff) 25% वरून थेट 50% केला. त्यामागचं एक कारण म्हणजे भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणं. अशा वेळी अमेरिकन तेल घेऊन भारताने व्यापारसंबंध संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला (Indian Oil Petroleum Company) होता.
ऊर्जा तज्ञांच्या मते, भारतीय कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती, किंमत आणि पुरवठ्याची खात्री या गोष्टींवरून पुरवठादार बदलत असतात. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार म्हणून भारताकडे कायमच किंमत आणि ऊर्जा सुरक्षितता हे प्रमुख निकष असतात. इंडियन ऑयलसारख्या कंपन्यांनी अमेरिकन तेलाऐवजी नायजेरिया आणि खाडी देशांकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने स्पष्ट होतं की, भारत सध्या ऊर्जा सुरक्षा आणि खर्च नियंत्रण या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देत आहे.
पुढील काही महिन्यांत जागतिक राजकारण, आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील चढउतार आणि मोठ्या देशांच्या धोरणांवर भारताच्या खरेदीची रणनीती किती बदलते हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. भारताने अमेरिकेला दिलेला हा निर्णय खरोखरच धक्कादायक ठरला आहे. आतापर्यंत अमेरिकन तेल खरेदी करून व्यापारिक संतुलन साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारताने अचानक खाडी आणि आफ्रिकन देशांकडून तेल आयात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महागड्या किंमती, वाढते वाहतूक खर्च आणि अमेरिकेने आयातीवर लादलेले टॅरिफ हे घटक लक्षात घेता भारताने ऊर्जा सुरक्षेला आणि परवडणाऱ्या पर्यायांना प्राधान्य दिलं आहे. या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापारिक संबंधांवर मोठा परिणाम होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.