जगाची मंदीकडे वाटचाल! कच्चे तेल 4 वर्षातील सर्वात निच्चांकीवर, थंड पेयांपेक्षाही स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल?

जगाची मंदीकडे वाटचाल! कच्चे तेल 4 वर्षातील सर्वात निच्चांकीवर, थंड पेयांपेक्षाही स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल?

world heading towards recession Crude oil lowest in 4 years: सध्या जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होतेय. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या किंमती गगनाला भिडत आहेत. तर दुसरीकडे मात्र गेल्या आठवड्याभरात जागतिक बाजार पेठेत कच्च्या तेलाच्या किंमती मात्र धडाधड आपटत आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती किती कमी झाल्या आहेत? त्याची कारण काय? जाणून घेऊ सविस्तर…

कच्चे तेल 4 वर्षातील सर्वात निच्चांकीवर…

मंदीमुळे मागणी घटनेच्या शक्यतेने कच्च्या तेलाच्या किंमती कोसळल्या आहेत. गेल्या आठवड्यात या किंमती तब्बल सुमारे वीस टक्कांनी कमी झाल्या होत्या. त्यामुळे आता जागतिक बाजार पेठेत कच्चे तेल प्रति बॅरल 63.21 डॉलरवर आले आहे. तर एमसीएक्सवर कच्चे तेल 5200 रुपयांवर आले आहे. या किंमती गेल्या चार वर्षांतील सर्वांत कमी किंमती आहेत.

कच्च्या तेलाच्या पडझडी मागील कारणं काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण हे या तेलाच्या पडझडी मागील मोठं कारण आहे. त्याचेच पडसाद जगभर पडले आहेत. दुसरीकडे अमेरिकेनंतर चीनने देखील अमेरिकेवर 34 टक्के टॅरिफ लावला आहे. सौदी अरबने गेल्या अनेक वर्षांनंतर तेलाच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. तसेच मंदी, व्यापार युद्धामुळे कच्चा तेलाच्या व्यापारावर दबाव निर्माण झाला आहे. तर सौदी अरबने विशेषत: अशियाई देशांसाठी तेलाच्या किंमती कमी केल्या आहेत. त्यामुळे मे महिन्यात अशियाई देशांना सौदीकडून अरब लाइट क्रूड प्रति बॅरल $2.3 किंमतीने घेता येणार आहे. ओपेक देशांनी उत्पादन वाढवण्याच्या निर्णयानंतर हा निर्णय घेतला आहे.

शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण, एकाच दिवसात 13.4 लाख कोटी बुडाले, चक्क 543 शेअर्सना लोअर सर्किट

दरम्यान या सर्व परिस्थितीवर ICICI सिक्युरिटीजचे एनर्जी अॅनॅलिस्ट प्रोबल सेन हे सांगतात की, कच्च्या तेलाच्या घटत्या किंमती ओएमसीसाठी चांगल आहे. सरकार तेलाच्या किंमती कमी करायला इंधन कंपन्यांना सांगू शकते मात्र ही गोष्ट अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे. तेलाच्या किंमती घटने म्हणजे अर्थव्यवस्था संकटात आहे. त्यामुळे सरकारने केवळ प्रती लिटरल 2 ते 3 रुपये किंमत कमी करावी तसेच ओएमसीला विस्तार योजना थांबवावी लागणार आहे. गेल्या महिन्यांत तेलांच्या किंमती उच्च होत्या. त्यामुळे तेल कंपन्यांना 8 ते 9 रुपयांचं मार्जिन होतं. मात्र तेलाच्या किंमती कमी झाल्यास कंपन्यांच मार्जिन कमी होईल. हे जनतेसाठी जरी फायदेशीर असलं तरी देखील ते ओएमसीसाठी चांगला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube