भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार

Navi Pillay : दक्षिण आफ्रिकेतील प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि मानवाधिकार तज्ज्ञ नवनेथम 'नावी' पिल्लई यांना  2026 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर

Navi Pillay

Navi Pillay

Navi Pillay : दक्षिण आफ्रिकेतील प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि मानवाधिकार तज्ज्ञ नवनेथम ‘नावी’ पिल्लई यांना  2026 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबत  नॉर्वेजियन नोबेल समितीने माहिती दिली आहे.  शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल नावी पिल्लई यांना पुरस्कार देण्यात आला आहे.  भारतीय वंशाच्या तमिळ कुटुंबात जन्मलेल्या नावी पिल्लई यांनी वर्णभेदाच्या काळात भेदभावाविरुद्ध आवाज उठवला आणि पुढे आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

नावी पिल्लई यांचा जन्म 23 सप्टेंबर 1941 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. त्यांचे कुटुंब तमिळ वंशाचे होते. वर्णभेदाच्या काळात वाढलेल्या नावी पिल्लई यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि 1967 मध्ये वकिली सुरू केली. नताल प्रांतात स्वतंत्र वकिलीचा व्यवसाय सुरू करणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या.

त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात अशा काळात केली जेव्हा दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी राजवटीत कृष्णवर्णीय लोकांना मूलभूत हक्क आणि समान संधी नाकारल्या जात होत्या. ज्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास व्यवस्था तयार नव्हती, अशा लोकांसाठी कायद्याला एक आवाज बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

शिवसेना कुणाची? ‘या’ दिवशी येणार निकाल; सर्वोच्च न्यायालयाने दिली मोठी अपडेट-

Exit mobile version