नोबेल पुरस्कार नाकारल्याने व्हाईट हाऊसचा संताप; ट्रम्प यांच्या टीमकडून नोबेल समितीवर टीका

व्हाइट हाऊसने टीका केली आहे. 'नोबेल समितीने मचाडो यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिलं आहे.

  • Written By: Published:
Nnobel2025

गेली अनेक दिवसांपासून नोबेल पारितोषिकासाठी आस लावून बसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Trump) यांचा अपेक्षाभंग झाला आहे. नोबेल पारितोषिक समितीने यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर केला आहे. त्यानंतर व्हाइट हाऊसने नोबेल पारितोषिक समितीवर टीका केली आहे. ‘नोबेल समितीने मारिया कोरिना मचाडो यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिलं आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शांतता करार करत राहतील, युद्धे संपवतील आणि जीव वाचवतील. त्यांच्याकडे मानवतेचे हृदय आहे आणि त्यांच्यासारखा कोणताही व्यक्ती इच्छाशक्तीच्या जोरावर पर्वतही हलवू शकतो, असं व्हाईट हाऊसचे प्रवक्ते स्टीव्हन च्युंग यांनी एक्स वर लिहिले आहे. नोबेल शांतता पुरस्काराच्या घोषणेपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर टीका केली होती.

Nobel Prize : डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं; मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार

बराक ओबामा यांना हा पुरस्कार कोणतेही काम न केल्याबद्दल आणि आपला देश उद्ध्वस्त केल्याबद्दल नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे. ओबामा चांगले राष्ट्राध्यक्ष नव्हते. २००८ मध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर आठ महिन्यांनी बराक ओबामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

२०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. त्या एक प्रसिद्ध राजकीय नेत्या आहेत. त्यांनी त्यांच्या देशात लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी सातत्याने लढा दिला आहे. मारिया कोरिना यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६७ रोजी व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे झाला. त्यांचे वडील हेन्रिक मचाडो हे एक उद्योगपती होते आणि तिची आई कोरिना पॅरिस्का या मानसशास्त्रज्ञ होत्या.

follow us