नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याला सहा महिन्यांची शिक्षा, कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याला सहा महिन्यांची शिक्षा, कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

Bangladesh news : बांग्लादेशी (Bangladesh news) नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Peace Prize) विजेते मोहम्मद युनूस (Mohammed Yunus) यांना कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या घटनेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले आहेत. बराक ओबामा यांच्यासह अनेक नोबेल विजेत्यांनी मोहम्मद युनूस यांना पाठिंबा दर्शवला आहे.

फिर्यादी खुर्शीद आलम खान म्हणाले, प्राध्यापक मोहम्मद युनूस आणि त्यांच्या तीन ग्रामीण टेलिकॉम सहकाऱ्यांना कामगार कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अपील प्रलंबित असल्याने चौघांनाही तात्काळ जामीन मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

काय प्रकरण आहे?
हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे बोलले जाते. 83 वर्षीय मोहम्मद युनूस यांना त्यांच्या मायक्रोफायनान्स बँकेद्वारे लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचे श्रेय जाते, परंतु पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी त्यांचे चांगले संबंध नाहीत. शेख हसीना यांनी त्यांच्यावर गरिबांचे रक्त शोषल्याचा आरोप सातत्याने केला आहे.

Jan Man Survey : 10 वर्षातील भारताच्या विविध क्षेत्रातील प्रगतीबद्दल काय वाटते? PM मोदींचा सवाल

शेख हसीना यांनी 2006 चे आंतरराष्ट्रीय नोबेल शांतता पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्यावर अनेक वेळा टीका केली आहे. अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस आणि त्यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांपैकी एक ग्रामीण टेलिकॉममधील तीन सहकाऱ्यांवर कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. मात्र त्यांनी ते आरोप नाकारले.

Japan : 33 हजारांहून अधिक घरांची ‘बत्ती’ गुल; भारताकडून आपत्कालीन हेल्पलाइन नंबर जारी

सप्टेंबरमध्ये मोहम्मद युनूस यांच्यावर खटला चालला तेव्हा अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने सरकारवर कामगार कायद्यांचे गैरवापर केल्याचा आरोप केला होता. युनूस यांच्याविरुद्धची फौजदारी कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यात म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज