पाकिस्तानचा अमेरिकेला गोंजारण्याचा प्रयत्न; नोबेल शांतता पुरस्कारासाठी दिला ट्रम्प यांना पाठिंबा

Donald Trump Pakistan : सध्या अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानला मोठी मदत हवी आहे. त्यामुळे ट्रम्प हेच खरे नोबेल शांतता पुरस्काराचे हकदार असल्याची पावती पाकिस्तानने दिली आहे. (Trump) या पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव पाकिस्तानने सुचवले आहे. दहशतवाद्यांना मांडीवर घेणार देश शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांचं नाव सुचवतो हेच मोठं हास्यास्पद आहे.
पाकिस्तान सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव 2026 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवलं आहे. तसा औपचारिक प्रस्तावच पाक सरकारने पाठवला आहे. सौदी अरबच्या विनंतीवरून भारत-पाकमधील तणाव लागलीच निवळल्याचा दावा पाकिस्तान सरकार करत होते. पण एकाच दिवसात त्यांनी टांगा पलटी केला. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या ताज्या तणावात ट्रम्प यांनी मोठी भूमिका निभावली. त्यांनी कुटनीतीचा वापर करत हस्तक्षेप केला.
जग युद्धाच्या उंबरठ्यावर; शांतीसाठी योगाची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
लष्कर प्रमुख असीम मुनीर याला व्हाईट हाऊसमध्ये बोलावण्यात आले होते. त्यामागील कुटनीती आता समोर येत आहे. पाकिस्तानला अमेरिकेकडून काही सवलती आणि व्यापारी सूट पदरात पाडून घेण्यासाठीच असा प्रस्ताव पाठवावा लागत असल्याची टीका पाकिस्तानातूनच होत आहे. भीकेचा कटोरा घेऊन अजून किती दिवस अमेरिकेच्या दारात पडून राहणार असा सवाल पाकिस्तानमधील बुद्धिवादी वर्ग विचारत आहे.
डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि रिपब्लिक ऑफ रवांडा या दोन देशात शांतता घडवून आणल्याचे श्रेय सुद्धा त्यांनी लाटले. आपण दोन्ही देशात शांतता प्रस्थापित केली. ही जगासाठी, अफ्रिकेसाठी चांगली वार्ता असल्याचे ते म्हणाले. पण मला यासाठी शांतता पुरस्कार मिळणार नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये यशस्वी मध्यस्थी केली. सर्बिया आणि कोसोवा यांच्यात शांतता घडवून आणली. इजिप्त आणि इथियोपिया या दोन देशात शांतता घडवून आणली. पण आपल्याला नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नसल्याची खंत ट्रम्प यांनी बोलून दाखवली.