“ट्रम्प यांनी मला फोन केला, अमेरिकेत बोलावलं पण मी मात्र..”, PM मोदींनी सांगितलं भेट टाळण्याचं कारण

PM Narendra Modi in Odisha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आज ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे एका जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं. या दरम्यान, मोदी म्हणाले, की ‘मी भगवान जगन्नाथांच्या भूमीत येण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका दौऱ्याचा आमंत्रणाला नम्रपणे नकार दिला. दोन दिवसांपूर्वी मी कॅनडात जी 7 समिटसाठी उपस्थित होतो. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी मला फोन केला. म्हणाले आता तुम्ही कॅनडात आलाच आहात तर जाता जाता वॉशिंग्टनमधून जा. त्यांनी मला आग्रहानं बोलावलं. मी म्हणालो धन्यवाद पण, मला तर महाप्रभूंच्या क्षेत्री जाणं खूप गरजेचं आहे. याच कारणामुळे मी अमेरिकेला जाण टाळलं’, असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
मोदी पुढे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर बराच काळ देशातील लोकांनी काँग्रेसचे मॉडेल पाहिले. काँग्रेसच्या काळात (Congress Party) देशात सुशासन नव्हतं आणि देशातील लोकांचं जीवनही अत्यंत कठीण होतं. रखडलेली अन् लटकलेली विकासकामं, प्रचंड भ्रष्टाचार हीच काँग्रेसच्या विकासाच्या मॉडेलची ओळख होती. पण आता मागील काही वर्षांपासून देश भाजपाचं विकास मॉडेल पाहत आहे.
गरिबांच्या मुलांनी जाब विचारू नये म्हणून… शाहंच्या इंग्रजीबाबतच्या वक्तव्यावर राहुल गांधींचा पलटवार
मागील दशकभरात देशातील काही राज्यांत पहिल्यांदाच भाजप सरकार अस्तित्वात आलं. या राज्यात फक्त सरकारच बदललं असं नाही तर सामाजिक उद्धार आणि आर्थिक परिवर्तनचा नवा अध्याय सुरू झाला आहे. आसाममध्ये एक दशकाच्या आधी स्थिती अत्यंत खराब होती. पण आज आसाम विकासाच्या मार्गावर वेगाने घोडदौड करत आहे.
त्रिपुरा राज्यातही अनेक वर्षांच्या डाव्या पक्षांच्या सरकारनंतर लोकांनी भाजपला संधी दिली. त्रिपुरात डाव्या पक्षांच्या काळात हिंसा आणि भ्रष्टाचाराने लोक हैराण झाले होते. पण जेव्हापासून भाजपला संधी मिळाली तेव्हापासून त्रिपुरा शांती आणि विकासाचे प्रतीक बनला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी सभेसाठी भाजप सरकारमधील मंत्री, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता टू-व्हिलरवरून घसरून पडणं विसरा; दुचाकींमध्ये येणार ABS सिस्टिम; नेमकं काय होणार?
पीएम मोदींचा ट्रम्प यांनी नकार
जी 7 परिषदेसाठी पीएम मोदी नुकतेच कॅनडात गेले होते. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना फोन करुन अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले होते. परंतु, मोदींनी त्यांना माझे दुसरे नियोजित कार्यक्रम असल्याचे सांगून नकार दिला होता. खरंतर ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं त्याचवेळी पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर सुद्धा अमेरिकेत होता. त्यामुळे ट्रम्प यांचा मोदींना बोलावण्या पाठीमागे वेगळाच उद्देश होता का अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नकार देत ट्रम्प यांचे सगळेच मनसुबे उधळून लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.