Indonesia Earthquake : आशिया खंडातील देशांमध्ये भूकंपांची संख्या वाढली आहे. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान, चीन आणि नेपाळ या देशांत भूकंप झाल्यानंतर आता इंडोनेशियाला (Indonesia Earthquake) भुकंपाचे धक्के बसले आहेत. आज मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला. नॅशनल सेंटकर फॉर सिस्मॉलॉजीनुसार पृथ्वीपासून 80 किलोमीटर खोलीवर भूकंपाचा (Earthquake) केंद्रबिंदू होती. त्यामुळे या भुकंपामुळे जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
Taiwan Earthquake : तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप! घरांची पडझड, नागरिकांची पळापळ
रिश्टर स्केलवर या भुकंपाची तीव्रता 6.7 इतकी नोंदवण्यात आली. इंडोनेशियातील तलौद बेटांवर हा भूकंप झाला. याआधी मागील आठवड्यात बलाई पुंगुट भागात भूकंप झाला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू 80 किलोमीटर खोल होता. त्यामुळे जीवित आणि आर्थिक नुकसान फारसे झाले नाही. इंडोनेशियात सातत्याने भूकंप होत असतात. यामागचे खरे कारण म्हणजे या परिसराची भौगोलिक रचना आहे. इंडोनेशिया प्रशांत महासागराच्या रिंग ऑफ फायर भागात वसलेले आहे. त्यामुळेच येथे सतत भूकंप होत असतात. रिंग ऑफ फायर भारत ऑस्ट्रेलिया, जुआन डी फुका, उत्तर अमेरिका आणि फिलीपन टेक्टोनिक प्लेट्सला जोडते.
याआधी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी जपानमध्ये भूकंप झाला होता. 7.6 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. या भूकंपानंतर येथे त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. भूकंपात 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच तीनशे पेक्षा जास्त लोक बेपत्ता झाले आहेत. या लोकांचा शोध घेण्याचे काम अजूनही सुरूच आहे.
जपानला एक दोन नव्हे तब्बल 155 भूकंपाचे धक्के; 12 ठार, हजारो नागरिक स्थलांतरित