जपानला एक दोन नव्हे तब्बल 155 भूकंपाचे धक्के; 12 ठार, हजारो नागरिक स्थलांतरित

  • Written By: Published:
Letsupp Image   2024 01 02T112550.477

Japan Earthquake Update : नववर्षाच्या पहिल्या दिवशी जपानला भीषण भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले. 7.6 एवढ्या भीषण तीव्रतेच्या भूकंपानंतर येथील हजारो नागरिकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यात आले आहे. आतापर्यंत या घटनेत 12 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी (दि.1) सकाळपासून जपानमधील विविध बेटांना एक दोन नव्हे तर, तब्बल 155 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ज्यात 7.6 ते 6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपांची नोंद करण्यात आली आहे. आगामी काळात देशाला आणखी शक्तिशाली भूंकपाचे धक्के बसू शकतात असा इशारा जपानच्या हवामान कार्यालयाने दिला आहे.

Manipur Violence : नव्या वर्षात मणिपूर पेटलं! गोळीबारात चौघांचा मृत्यू, पाच जिल्ह्यांत कर्फ्यू

त्सुनामीचा इशारा

7.6 रिश्टर स्केल एवढ्या तीव्र भूकंपाच्या धक्क्यांनंतर प्रशासनातर्फे लगेचच त्सुनामीचा (Tsunami) इशारा देण्यात आला होता. तर, जपानमंधील 33 हजाराहून अधिक घरांतील बत्ती गुल झाली आहे. तसेच रस्त्यांवर भेगा पडल्याने प्रमुख महामार्गांसह देशाभरातील अनेक महामार्गा ठप्प झाले आहेत. यामुळे नागरिकांना वैद्यकीय मदत पोहचवण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जपानमधील ताजी परिस्थिती काय?

भूकंपाच्या धक्क्यानंतर जपानमधील विविध भागांमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विमानतळांवरील धावपट्टींना तडे गेल्याने विमानसेवा कोलमडली असून, अनेक ठिकाणच्या रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. भूंकपामुळे चार एक्सप्रेसवे, दोन हाय-स्पीड रेल्वे सेवा, 34 लोकल ट्रेन लाइन आणि 16 फेरी लाईन्स थांबवण्यात आल्याचे जपानच्या परिवहन मंत्रालयाने सांगितले आहे. याशिवाय आतापर्यंत 38 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा उत्सव होणार? “22 जानेवारील सार्वजनिक सुट्टी द्या” : भाजपची मागणी

भारतीयांसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना 

भीषण भूकंपानंतर भारत सरकारकडून जपानमधील भारतीय नागरिकांसाठी जपानस्थित भारतीय दुतावासाकडून आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच मदतीसाठी हेल्पलाईन नंबर्सही जारी करण्यात आले आहे. दुतावासाकडून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “1 जानेवारी 2024 च्या भूकंप आणि त्सुनामीच्या संदर्भात दूतावासाने आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. कोणत्याही मदतीसाठी या आपत्कालीन क्रमांक आणि ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.” असं दुतावासाकडून आवाहन करण्यात आलं आहे.

 

follow us