Insurance Fraud : इन्शुरन्स पॉलिसी ( Insurance Policy ) काढल्यानंतर संबंधित पॉलिसीधारकाला पॉलिसींच्या अटी शर्थी्नुसार मृत्यूनंतर किंवा अपघात झाल्यास ठराविक रक्कम मिळते. मात्र अनेकदा ही रक्कम मिळवण्यासाठी पॉलिसी धारकांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून घोटाळे ( Insurance Fraud ) करून रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. असाच काहीसा प्रकार तब्येत अकरा कोटींच्या इन्शुरन्ससाठी एका विद्यार्थ्याने केला आहे.
सद्गगुरु जग्गी वासुदेव यांच्या भक्तांसाठी चिंतेची बातमी : मेंदूवर पार पडली मोठी शस्त्रक्रिया
या विद्यार्थ्याने आपल्या शरीराला इजा पोहोचवण्यासाठी तब्बल दहा तास ड्राय आईसमध्ये आपले पाय ठेवल्याचं समोर आला आहे. ही घटना तैवान युनिव्हर्सिटीतील एका तरुणासोबत घडली असून या दुर्घटनेमध्ये त्याचे पाय कापावे लागले आहेत. झॅंग असे विद्यार्थ्यांचे नाव असून तो 23 वर्षांचा आहे. या विद्यार्थ्याने इन्शुरन्स घोटाळा करण्यासाठी स्वतःलाही इजा पोहोचवल्याचं समोर आलं आहे. यासाठी त्याने तब्बल दहा तास ड्राय आइसच्या बादलीमध्ये पाय घालून ठेवले होते. याबाबत पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
पवारांनी भाकरी फिरवली; धनुभाऊंचा खास माणूसच पंकजांचा पेपर अवघड करणार!
या विद्यार्थ्याच्या लियाओ या एका साथीदाराने त्याला हे कृत्य करण्यास भाग पाडलं. कारण लियाओ क्रिप्टो करेन्सी ट्रेडिंगमध्ये तोट्यात होता. त्यासाठी त्याने झॅंगला काही कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करायला सांगितल्या. ज्यानुसार झॅंगला लियाओला तब्बल 80 लाख डॉलर द्यावे लागणार होते. तसेच पुढे लियाओने झॅंगला गँगस्टर मागे लागल्याच्या धमक्या देखील दिल्या.
यातच या मित्राने झॅंगला कडाक्याच्या बर्फाळ वातावरणामध्ये फिरायला नेले. जेणेकरून त्याला फ्रॉस्टबाईट होईल. मात्र डॉक्टरांच्या तपासामध्ये अशा प्रकारचं फ्रॉस्टबाईट हे वातावरणातील बर्फामुळे नाही. तर ड्राय आईसच्या संपर्कात आल्याने झालं आहे. त्यामुळे या दोघांचाही हा इन्शुरन्ससाठी घोटाळा करण्याचा कट समोर आला. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.
ड्राय आईस म्हणजे काय?
ड्राय आईसहा एक प्रकारचा कोरडा बर्फ आहे. ज्याचं तापमान तब्बल मायनस 80 डिग्री असतं. हा बर्फ केवळ कार्बन डाय-ऑक्साइड पासून बनवलेला असतो. ज्याप्रमाणे सामान्य बर्फ तोंडात टाकतात विरघळतो. मात्र हा ड्राय आईस विरघळताना कार्बन डाय-ऑक्साइड बनतो. अत्यंत कमी तापमान असल्याने या ड्राय आइसचा वापर साधारणपणे किराणा तसेच औषधांच्या जतनासाठी केला जातो. तसेच फोटोशूट आणि थेटरमध्ये देखील त्याचा वापर केला जातो.
नेमके काय दुष्परिणाम होतात?
ड्राय आईस एखाद्या बंद खोलीमध्ये जिथे व्हेंटिलेशन नाही. तिथे ठेवल्यास त्यातील कार्बन डाय-ऑक्साइड वातावरणात पसरून जीव गुदमरणे, डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास होणे, थरकाप होणे, कानामध्ये सुन्न आवाज येणे, ओठ आणि नखं पिवळे पडणे. यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त काळापर्यंत ड्राय आईसचा वापर केल्यास फ्रॉस्टबाईट आणि त्वचेला नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर ड्राय आईसचे सेवन केल्याने तो विरघळताना कार्बन डाय-ऑक्साइडमध्ये रूपांतरित होईल. ज्यामुळे तोंडातील स्नायू आणि पेशींचा मोठं नुकसान होतं. अशा घटनांमध्ये एखाद्या व्यक्ती बेशुद्ध होऊ शकतो किंवा गंभीर परिणाम झाल्यास मृत्यू देखील होऊ शकतो.