Government Schemes : आम आदमी विमा योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : आम आदमी विमा योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील सर्व प्रवर्गातील भूमिहीन शेतकरी मजूर (Landless agricultural labourers)यांना विमा संरक्षण (Insurance coverage)व शिष्यवृत्ती (scholarship)उपलब्ध करुन देण्यासाठी आम आदमी विमा योजना (Aam Aadmi Bima Yojana)सुरु केली आहे.

गडाखांच्या विरोधात भाजप भास्करगिरी महाराजांना मैदानात उतरविणार ? देवगड संस्थानचा थेट खुलासा

योजनेसाठी अटी :
ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन शेतमजूरांना तसेच 2.5 एकर पेक्षा कमी बागायती व 5 एकर पेक्षा कमी जिरायती शेतजमीन धारण करणाऱ्यांना या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. वार्षिक विम्याचा हप्ता रु.200/- इतका असून केंद्र शासनामार्फत रु.100/- व राज्य शासनामार्फत रु.100/- इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळाला देण्यात येतो.

महायुतीत जागावाटपावरून तिढा! रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपचीच; राणे शड्डू ठोकत मैदानात

लाभाचे स्वरूप :
या योजनेंतर्गत खालीलप्रमाणे घटना घडल्यास लाभार्थीच्या वारसदारास / लाभार्थ्यास रक्कम दिली जाते.
नैसर्गिक मृत्यू – रु. 30,000/-
अपघाती मृत्यू – रु.75, 000/-
अपघातात कायमचे अपंग – रु.75, 000/-
अपघातात दोन्ही डोळे वा दोन्ही पाय गमावल्यास – रु.75, 000/-
अपघातामुळे एक डोळा वा एक पाय गमावल्यास – रु.37, 500/-
या योजनेंतर्गत लाभार्थीच्या 9 वी ते 12 वी इयत्तेत शिकणाऱ्या 2 मुलांना रु.100/- प्रतिमहा प्रति विद्यार्थी शिष्यवृत्ती देण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे :
– आधार कार्ड
– जन्माचा दाखला
– शाळा सोडल्याचा दाखला
– मतदान कार्ड
– रेशन कार्ड

संपर्क कार्यालयाचे नाव : जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube