Download App

Bangladesh Protests : मोठी बातमी! बांग्लादेशात स्थापन होणार अंतरिम सरकार, गुरुवारी शपथविधी

Bangladesh Protests :  नोबेल पारितोषिक विजेते डॉ मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार उद्या (गुरुवार 08 ऑगस्ट

  • Written By: Last Updated:

Bangladesh Protests :  नोबेल पारितोषिक विजेते डॉ. मुहम्मद युनूस (Dr. Muhammad Yunus) यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार उद्या (गुरुवार 08 ऑगस्ट) रात्री 8.00 वाजता शपथ घेईल असे लष्कर प्रमुख जनरल वकेर-उझ-झमान (Waker-uz-Zaman) यांनी आज माध्यमांना माहिती दिली आहे.

तसेच या सरकारमध्ये 15 सदस्य असतील. मात्र, नंतर ही संख्या बदलू शकते अशी देखील माहिती त्यांनी माध्यमांना दिली.  84 वर्षीय अर्थतज्ज्ञ युनूस यांची मंगळवारी राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन (Mohammad Shahabuddin) यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. माहितीनुसार, मोहम्मद युनूस हे उद्या पॅरिसहून बांगलादेशला परतणार आहेत. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार शपथ घेणार आहे.

गेल्या महिन्याभरापासून बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन होत आहे. या आंदोलनात आतापर्यंत 400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी देखील झाले आहे. या आंदोलना हिंसक वळण आल्यानंतर बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला तसेच देश सोडून पळ काढला आहे. सध्या शेख हसीना भारतात आहे. त्यांना लंडनमध्ये आश्रय न मिळाल्याने शेख हसीना यूएई, सौदी अरेबिया किंवा फिनलंडला जाऊ शकतात. असा दावा देखील काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये लष्कर प्रमुख जनरल वकेर-उझ-झमान यांनी ज्या विद्यार्थ्यांनी देशभरातील रस्ते स्वच्छ करण्याचे काम केले आणि वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीत वाहतूक व्यवस्थापित केली त्यांचे देखील कौतुक केले आहे. यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थी खूप छान काम करत आहे. ट्रॅफिक पोलिस नसतानाही त्यांनी वाहतूक नियंत्रित करण्याचे काम केले. तसेच मी त्यांना हे काम पुढे देखील सुरु ठेवण्याची विनंती करतो असं देखील यावेळी लष्कर प्रमुख जनरल वकेर-उझ-झमान म्हणाले.

हिंसाचारापासून दूर राहा

तर दुसरीकडे डॉ. युनूस यांनी सर्वांना हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करतो.

ऑलिम्पिकसाठी 70 लाखांची मदत; जागतिक दर्जाचे प्रशिक्षक; केंद्रीय क्रिडा मंत्र्यांनी सगळं सांगितलं

तुम्ही सर्व प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहा. त्यांनी या निवेदनात  सर्व विद्यार्थी, सर्व राजकीय पक्षांचे सदस्य आणि बिगर राजकीय लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

follow us