“चीनी नागरिकांनो पाकिस्तान सोडा नाहीतर..” BLA च्या धमकीने उडाली खळबळ

पाकिस्तानात राहत असलेल्या चीनी नागरिकांनी तत्काळ पाकिस्तानातून चालते व्हावे असा इशारा बीएलएने दिला आहे.

Bla

Bla

Baloch Liberation Army : बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानात धुमाकूळ घातला आहे. यामुळे पाकिस्तानी (Baloch Liberation Army) सैन्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. बलूच आर्मीने आाता आणखी पुढचे पाऊल टाकले असून चीनी नागरिकांना टार्गेट केले आहे. पाकिस्तानात राहत (Pakistan) असलेल्या चीनी नागरिकांनी तत्काळ पाकिस्तानातून चालते व्हावे. जर आमच्या परिसरात एकही चीनी आढळून आला तर त्याला थेट ठार मारले जाईल अशी धमकी बीएलएने (BLA) दिली आहे. इतकेच नाही तर चीनी नागरिकांना टार्गेट करण्यासाठी एक स्पेशल युनिट तयार करण्यात आली आहे. बीएलएच्या या नव्या धमकीने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. याआधीही या बीएलएच्या हल्लेखोरांनी चीनी नागरिकांवर हल्ले केले आहेत.

बलूच आर्मीच्या आत्मघाती पथकाने पाकिस्तानात (Pakistan) हल्ले करत 70 लोकांना ठार केले आहे. यामध्ये पाकिस्तानी सैन्यातील आणि पोलीस दलांतील 14 जवानांचा समावेश आहे. चीन पाकिस्तानात CPEC कॉरिडोर तयार करत आहे. या प्रोजेक्टसाठी चीनने पाण्यासारखा (China) पैसा खर्च केला आहे. हा प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीत पूर्ण व्हावा अशी चीनची इच्छा आहे. मात्र बलूच आर्मीने आता जे धोरण घेतले आहे त्यावरून हा प्रोजेक्ट (CPEC Project) पूर्ण होईल याची शक्यता मावळत चालली आहे. या प्रोजेक्टसाठी चीनने अनेक अभियंते आणि अधिकारी येथे तैनात केले आहेत.

Pakistan : सरकारी कार्यक्रमात ‘रेड कार्पेट’ बंद; खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तानचा निर्णय

चीनी प्रोजेक्ट विरोधात बीएलए

बलूच हल्लेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पाकिस्तान सरकारने जून महिन्यात एक मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत बलूच आर्मीवर नियंत्रण मिळवू असे पाकिस्तानला वाटत होते. पण हा प्रयोग फसला. यानंतर बलूच हल्लेखोर जास्तच भडकले असून त्यांनी पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यात बलूच लिबरेशन आर्मी, बलूच लिबरेशन फ्रंट आणि तहरीक ए तालिबान या संघटना एकत्रित काम करत असल्याचे सांगितले जात आहे.

चीन-पाकिस्तानसाठी टेन्शनच

बलूचिस्तानातील तुर्बत परिसरातील आर्मी कँपवर हल्ला करून 130 पाकिस्तानी जवानांना मारल्याचा दावा बीएलएने केला आहे. पाकिस्तानी सैन्याने यावर अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण बलूच आर्मीने जो दावा केला आहे त्यामुळे पाकिस्तान आणि चीनचं टेन्शन नक्कीच वाढणार आहे. बीएलएने धमकी दिली आहे की चीनी नागरिकांनी ग्वादर आणि बलूचिस्तान सोडले नाही तर त्यांना ठार मारण्यात येईल अशी धमकी दिली आहे.

Pakistan : पाकिस्तान सरकारला धक्का! जुन्या मित्राने नाकारली मोठी ऑफर?

Exit mobile version