Download App

धक्कादायक! ब्राझीलमध्ये प्रवासी विमान कोसळले, तब्बल 62 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

ब्राझीलमध्ये 62 प्रवाशांना घेऊन जाणारे एक विमान कोसळले. या अपघातात विमानातील क्रू मेंबर्ससह तब्बल 62 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Brazil Plane Crash : ब्राझीलमधून अतिशय धक्कादायक बातमी समोर (Brazil Plane Crash) आली आहे. 62 प्रवाशांना घेऊन जाणारे एक विमान कोसळले. या अपघातात विमानातील क्रू मेंबर्ससह तब्बल 62 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु या अपघातात कुणीही बचावण्याची शक्यता दिसत नाही. वोएपास एअरलाइन्सने या घटनेला दुजोरा दिला आहे. साओ पाउलो आंतरराष्ट्रीय विमानतळ ग्वारुलोसकडे निघालेल्या विमानाचा अपघात झाला. या विमानात 52 प्रवासी आणि चार क्रू मेंबर होते. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे मान्य करण्यात आले असले तरी ही घटना नेमकी कशामुळे घडली त्याची कारणे सांगितलेली नाहीत.

दक्षिण ब्राझीलमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रपती लुईस इनासियो लूला दा सिल्वा यांना अपघाताची माहिती मिळाली. यावेळी त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थितांना एक मिनिटाचे मौन धारण करण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की विमानातील सर्व प्रवासी आणि स्टाफ मयत झाले आहेत.

ब्राझीलमध्येही तोषाखाना प्रकरण; माजी राष्ट्रपतींनी विकल्या करोडोंच्या भेटवस्तू

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि नागरिक सुरक्षा प्राधिकरणाने घटनास्थळी धाव घेतली. ग्लोबोन्यूजनेही या अपघाताची माहिती दिली आहे. या अपघाताचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. स्थानिक अग्निशमन कर्मचाऱ्यांनीही विमानाला अपघात झाल्याचे सांगितले आहे. या व्यतिरिक्त आधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

विमान 17 हजार फूट उंचावरून खाली कोसळले. स्थानिक वेळेनुसार ही घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी विमान पृथ्वीपासून 17 हजार फूट उंचावर होते. पुढील दहा सेकंदातच 250 फूट खाली आले. त्यानंतर पुढील आठ सेकंदात आणखी 400 फूट खाली आले. पुन्हा आठ सेकंदांनंत 200 फूट खाली आले. यानंतर एक मिनिटात 17 हजार फूट खाली आले आणि सगळेच संपले.

या अपघाताचे थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विमानाचा अपघात कसा झाला हे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. विमान खाली कोसळल्यानंतर प्रवाशांचे सामान आणि त्यांचे मृतदेह सर्वत्र पडलेले दिसत आहेत. स्थानिक प्रशासनाने पुढील कार्यवाहीस सुरुवात केली आहे. या अपघातावर जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Brazil Plane Crash : ब्राझीलमध्ये विमानाचा भीषण अपघात! 14 प्रवाशांच्या मृत्यूने खळबळ

follow us