America Iran War : अमेरिका इराण (America Iran War ) युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना इराणवर हल्ला करु नका, अशी विनंती केलीयं. या विनंतीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या इराणवरील हल्ल्याला तुर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता सध्या तरी अमेरिका-इराणमधील संघर्ष थांबला असला तरीही पुढील काळात हा संघर्ष तापणार असल्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सध्या महत्त्वाची चर्चा सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
आखातमधील कतार, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिराती (UAE) या आखाती देशांच्या प्रमुखांनी अमेरिकेला इराणवर तातडीने लष्करी कारवाई न करण्याची आग्रहाची विनंती केली होती. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये सकारात्मक प्रगती होत असून, यातून अमेरिकेला मान्य होईल असा मार्ग निघू शकतो, असं आखाती देशांनी ट्रम्प यांना सांगितले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करून या निर्णयाची माहिती दिलीयं. कोणत्याही प्रकारचा हल्ला, युद्ध न करता जर प्रश्न सुटत असेल तर आनंदच होईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. तसेच इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे बनवू दिली जाणार नाहीत, या भूमिकेवर अमेरिका ठाम असल्याचंही ट्रम्प म्हणाले आहेत. तसेच जर चर्चा अपयशी ठरली, तर अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर सर्वात मोठा आणि पूर्ण क्षमतेने लष्करी हल्ला करण्यास सज्ज असेल, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय.
BCCI वर RTI लागू नाही; केंद्रीय माहिती आयोगाचा मोठा यू-टर्न, 2018 चा निर्णयही रद्द
दरम्यान, अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांकडून लष्काराला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर दुसरीकडे आखातमधील इतर देश युद्ध होऊ नये, या भूमिकेत आहेत.
