Iran Israel Conflict Strikes Form 2300 km Attacked : इस्रायलने इराणवर हल्ला करून 72 तास उलटले आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत 406 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 643 जण जखमी असल्याची माहिती मिळत (Iran Israel Conflict) आहे. इराणी (Iran) हल्ल्यात आतापर्यंत 16 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 72 तासांत इस्रायलने इराणच्या प्रत्येक संभाव्य पायाभूत सुविधा (Israel) आणि लक्ष्यांवर हल्ला केलाय.
इस्रायलने दावा केलाय की, गेल्या 24 तासांत त्यांनी ‘हवाई मार्ग’ तयार केलाय. इस्रायली दाव्यानुसार, आता इस्रायली हवाई दल त्यांच्या देशातून तेहरानमध्ये उड्डाण करू शकते. कोणत्याही अडथळ्याशिवाय हल्ले करू (War News) शकते. इस्रायलने इराणवर सर्वात लांब अंतरावरून हल्ला केला आहे. इस्रायली हवाई दलाने इस्रायलपासून सुमारे 2,300 किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्व इराणमधील मशहाद विमानतळावर इराणी इंधन भरणाऱ्या विमानावर हल्ला केला. हल्ल्यानंतर विमानाला आग लागली आणि ते नष्ट झाले. ऑपरेशन रायझिंग लायनच्या सुरुवातीपासून हा सर्वात लांब अंतराचा हल्ला आहे.
ब्रेकिंग! भूकंपाच्या धक्क्यांमुळे पेरू हादरला… लोक घाबरले, अनेक जखमी
यंत्रणेचे मोठे नुकसान
लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर, इस्रायल आता लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे. इस्रायलने तेहरानमध्ये जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र लाँचर नष्ट केले आहे. आयडीएफने या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला आहे. युद्ध सुरू होताच इस्रायलने इराणच्या अणु तळांवर हल्ला केला. इस्रायलच्या हल्ल्याचे पहिले लक्ष्य नॅन्टेस अणु स्थळ होते. इस्रायलचा दावा आहे की त्यांच्या हल्ल्यामुळे नॅन्टेस येथील युरेनियम समृद्धीकरण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायलने इस्फहान आणि फोर्डो येथील अणुस्थळांवरही हल्ला केला आहे. येथे झालेल्या नुकसानाची माहिती सार्वजनिक केलेली नाही.
कुंडमळा पूल दुर्घटना! 4 मृत, 51 जखमी…रेस्क्यू ऑपरेशन पुन्हा सुरू, पावसाचा अडथळा
इराणच्या लष्करी तळावर हल्ला
अणुस्थळाव्यतिरिक्त, इस्रायलने इराणच्या लष्करी तळावरही हल्ला केलाय. त्याचे मोठे नुकसान झाले आहे. तेहरान आणि इतर शहरांमधील लष्करी तळांवर हल्ला करण्यात आलाय. यामध्ये क्षेपणास्त्र उत्पादन सुविधांचा समावेश आहे. दक्षिण इराणमधील एका रिफायनरीत मोठा स्फोट झाला आहे. तबरीझ आणि केरमानशाहमधील दोन क्षेपणास्त्र तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. इस्रायली हल्ल्यामुळे राजधानी तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. अनेक निवासी क्षेत्रे आणि सरकारी इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. मेहराबाद विमानतळावर परिणाम झाला आहे. इराणने तेहरान विमानतळ बंद केले आहे.