Iran Israel Conflict : इस्त्रायलवरील हल्ला इराणला भोवणार; कठोर निर्बंधांचा अमेरिकी प्लॅन तयार
Iran Israel Conflict : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध सुरू (Iran Israel Conflict) असतानाच इराणने इस्त्रायलवर हल्ला केला. या हल्ल्याचे तीव्र पडसाद जगभरात उमटले आहेत. पश्चिमी आणि युरोपातील देशांनी इराणवर कठोर शब्दांत टीका केली. त्यानंतर आता अमेरिकेने कठोर निर्णय घेण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. इराणवर आणखी कठोर निर्बंध लादणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी सांगितले की इराणच्या संरक्षण मंत्रालयाला पाठिंबा देणाऱ्या संस्थांवर निर्बंध लादण्याव्यतिरिक्त अमेरिका इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन प्रकल्पांवर निर्बंध टाकणार आहे.
इराणच्या मिसाइल आणि ड्रोन प्रोग्रामवर आम्ही कठोर निर्बंध लादणार आहोत. याबाबत आम्हाला आमच्या सहकाऱ्यांकडूनही मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. याबाबत अधिक माहिती देताना सुलिवन म्हणाले, नवीन निर्बंध आणि अन्य उपाययोजना इराणची लष्करी क्षमता आणि परिणामकारकता रोखण्यासाठी निर्बंध टाकणार आहोत. आम्ही इराणवर दबाव टाकत राहू. अमेरिकेने मागील तीन वर्षांत क्षेपणास्त्रे आणि ड्रोन संबंधित निर्बंधांसोबतच दहशतवादाशी संबंधित 600 हून अधिक व्यक्त आणि संस्थांवर निर्बंध लादले आहेत, याचीही त्यांनी यानिमित्ताने आठवण करून दिली.
Iran-Pakistan मध्ये तणाव आणखी वाढला; इराणमध्ये 9 पाकिस्तानींवर झाडल्या गोळ्या
इराण सरकारला त्याच्या घातक आणि अस्थिर कृत्यांसाठी जबाबदार धरले पाहिजे. यासाठी जगभरातील आमचे सहकारी आणि भागीदारांशी समन्वय साधून अमेरिका काम करील,असे सुलिवन यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आगामी काळात अमेरिकेकडून इराणची कोंडी होणार असल्याेच दिसून येत आहे.
दरम्यान, इराणने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी (Jo Biden) राष्ट्रीय सुरक्षा पथकाची भेट घेतली होती शनिवारी त्यांनी इस्त्रायलवरी हल्ल्यांच्या पार्श्वभुमीवर या टीमची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या हल्ल्यानंतर जगभरातील परिस्थिती पुन्हा बदलली आहे.
इराणने गेल्या काही वर्षांपासून ड्रोन आणि सायबर क्षमतांचा विस्तार करण्यावर खूप लक्ष दिले आहे. तर इस्रायलकडे अत्याधुनिक लढाऊ विमाने, आयर्न डोमसारखी आधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा आहे. यामुळे जर या दोन्ही देशात युद्ध झाला तर याचा फटका दोन्ही देशांसह संपूर्ण जगाला बसल्याची शक्यता आहे.
Iran Attacks Pakistan : इराणचा पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक; दहशतवाद्यांचा अड्डा उद्धवस्त