US Iran War : इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष (US Iran War) अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे. या युद्धात अमेरिकेने उडी घेतली. अमेरिकी बॉम्बर्सने इराणच्या आण्विक ठिकाणांवर बॉम्बफेक केली. या हल्ल्यानंतर इराणही खवळला (Iran Attack on Israel) असून त्याने इस्त्रायलवर पलटवार केला. तसेच इराणच्या आण्विक ऊर्जा संघटनेने एक निवेदन जारी केले. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेच्या या हल्ल्यांवर तीव्र संताप व्यक्त केला. या हल्ल्यांतून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले आहे असा आरोप त्यांनी केला. यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करण्यासाठी मॉस्कोला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याआधी इराणी सरकारी वृत्तसंस्था IRNA ने फोर्डो आण्विक ठिकाणावर हल्ला झाल्याचे मान्य केले होते. या हल्ल्यात इस्फहान आणि नतांज या आण्विक ठिकाणांचाही (Iran Nuclear Sites) समावेश होता. इस्फहानचे उपराज्यपाल अकबर सालेही यांच्या हवाल्याने IRNA ने माहिती दिली की आण्विक ठिकाणांच्या आसपास हल्ले झाले आहेत.
आण्विक ठिकाणांवर झालेले हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करतात. आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा एजन्सीची उदासीनता आणि संगनमतामुळे ही कारवाई झाली. अमेरिकेने या हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे. आता आंतरराष्ट्रीय समुदाय या अराजकतेची निंदा करेल आणि इराणच्या अधिकारांना पाठिंबा देईल असे तेहरानच्या एजन्सीने म्हटले आहे.
Iran and Israel War : इराणला अण्वस्त्र पुरवण्यास अनेक देश तयार, रशियाच्या माजी अध्यक्षांचा दावा
IRNA वृत्तसंस्थेनुसार इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियन यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रों यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केली. आण्विक ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले केल्यानंतर तेहरानच्या दक्षिणेतील कोम शहरातील नागरिकांना कोणताही धोका नाही असे इराणी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस (United Nations) यांनी सांगितले की आण्विक ठिकाणांवर अमेरिकेने केलेले (US Attack on Iran) हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत. आता संघर्ष वेगाने आवाक्याबाहेर जाण्याचा धोका वाढला आहे. याचे गंभीर परिणाम (Iran Israel War) नागरिक आणि जगावर होतील. या धोकादायक प्रसंगात अराजकतेपासून वाचणे जास्त महत्वाचे आहे, असे गुटेरेस यांनी सांगितले.
एका मानवाधिकार संघटनेने सांगितले की इराणवरील इस्त्रायलच्या (Israel Attack on Iran) हल्ल्यात कमीत कमी 865 लोकांचा मृत्यू झाला आहे. 3 हजार 396 लोक जखमी झाले आहेत. ह्यूमन राइट्स अॅक्टिविस्टसने संपूर्ण इराणची (Iran News) आकडेवारी सादर केली आहे. मयतांत 363 नागरिक आणि 215 सुरक्षा दलांचे जवानांचा समावेश आहे.
‘इराण’चे स्वप्न धुळीस मिळविणारे बंकर बस्टर बॉम्ब किती घातक ?