‘इराण’चे स्वप्न धुळीस मिळविणारे बंकर बस्टर बॉम्ब किती घातक ?

या हल्ल्यानंतर अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-57 बंकर बस्टर बॉम्ब (Bunker Buster Bomb) हे नावे चर्चेत आलेत.

  • Written By: Published:
Bunker Buster Bomb-Iran Israel War

Bunker Buster Bomb-Iran Israel War-इस्रायल-इराणमध्ये जोरदार संघर्ष सुरू (Iran-Israel War) आहे. दोन्ही देशांकडून एकमेंकावर हवाई हल्ले सुरू आहेत. या दोन्ही देशांच्या संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतलीय. अमेरिकेने इराणमधीत तीन अणुतळावर हल्ले केलेत. नतान्झ, फोर्डो आणि इस्फहान हे जमिनीखाली असलेले हे अणुतळ अमेरिकेने उद्धवस्त करून टाकल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) केलाय. या हल्ल्यानंतर अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-57 बंकर बस्टर बॉम्ब (Bunker Buster Bomb) हे नावे चर्चेत आलेत. बंकर बस्टर बॉम्बची शक्ती किती आहे. हा बॉम्ब वाहणारे लढाऊ विमान स्टेल्थ बॉम्बर्स काय आहे हे पाहुया…


भारतात सोनंच सोनं! वर्ल्ड गोल्ड काउंसिलचा अहवाल, आकडे ऐकून व्हाल थक्क..

बंकर बस्टर बॉम्ब आहे काय ?
बंकर बस्टर बॉम्बचे खरे नाव GBU-57A/B मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर (MOP) आहे. या बॉम्बचे वजन सुमारे 14 हजार किलो इतके आहे. त्या बॉम्बची ताकद मोठी आहे. हे बॉम्ब 60 फूट जाडीच्या काँक्रीटच्या भिंतीत घुसू शकते. जमिनीखाली 200 फूट खोलीपर्यंत स्फोट होतो. या बॉम्बचे 2013 पर्यंत कमीत कमी 20 युनिट्स निर्मिती केलीय. केवळ अमेरिकेकडे असे बॉम्ब आहेत. हा नॉन–न्यूक्लियर पारंपरिक बंकर बस्टर बॉम्ब आहे. हा बॉम्ब केवळ बी-2 बॉम्बर या खास विमानातूनच नेता येतो.

इराण खवळला! अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इस्त्रायलवर पलटवार; 10 शहरांवर इराणी मिसाइल कोसळल्या


हा बॉम्ब खास का आहे ?

बंकर बस्टर बॉम्ब जमिनीच्या आत विशेष सुरक्षेसह बांधलेले तळ नष्ट करण्यास सक्षम आहे. जसे की अणु संयंत्रे, शस्त्रास्त्रे डेपो किंवा उच्चस्तरीय लष्करी कमांड बंकर. यामुळेच अमेरिकेने इराणसारख्या धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील देशाच्या खोल लष्करी तळांवर त्याचा वापर केलाय.

तीनशे फूट खोल जमिनीखाली हल्ला

इराणमध्ये जमिनीखाली 150 ते 300 फूटावर अणुबॉम्ब तयार करण्याचे काम सुरू होते, असा दावा केलाय जातोय. या विशेष प्रकारच्या बॉम्बने हे तळ नष्ट केले आहेत. त्याचबरोबर येथील अणुतळ उद्धवस्त झालेत. त्याचबरोबर तेथील शास्त्रज्ञ, लष्करी अधिकारी ही ठार झाल्याचा दावा केला जातोय.


बी-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बरचे काम काय ?

अमेरिकेने इराणच्या भूमिगत अणुतळांवर केलेल्या हल्ल्यासाठी बी-2 स्पिरिट हेल्थ बॉम्बर या विशेष विमानाचा वापर केलाय. या विमानाचे वैशिट्ये जाणून घेऊया.. बी-2 बद्दल खास गोष्ट म्हणजे ते रडारवर येत नाही. त्यामुळे त्याला अदृश्य विमान असे म्हटले जाते. हे जगातील एकमेव ऑपरेशनल स्टेल्थ बॉम्बर आहे. त्याची किंमत तब्बल 2 अब्ज डॉलर्स इतकी असून, सर्वात प्रगत बॉम्बर विमान आहे. हे विमान जीपीएसशिवायही शत्रू राष्ट्रात जाते. फक्त दोन वैमानिक या विमानात असतात. संपूर्ण मिशन ऑपरेशन सॉफ्टवेअर आणि स्वयंचलित प्रणालीद्वारे नियंत्रित केले जात आहे. या विमानाची क्षमता तब्बल 18 हजार किलो बॉम्ब वाहून नेण्याची आहे. हे विमान हवेत इंधन भरून 18 हजारांहून अधिक किलोमीटर अंतर पार करू शकते. इराणवर झालेल्या हल्ल्यात या विमानाने 11 हजार 400 किलोमीटर अंतर पार केले. त्यासाठी हवेतच विमानाच इंधन भरण्यात आले. इराणमध्ये हल्ला करून पुन्हा अमेरिकेत येण्यासाठी विमानाने 37 तासांपेक्षा जास्त वेळ लागल्याचे बोलेले आहेत.

इराण-इस्रायल हे युद्ध हे केवळ हवाई हल्ल्यातूनच होत आहे. त्यात अमेरिकेनी हवाई हल्ला करून उडी घेतलीय. इस्रायल व इराण हे राष्ट्र शेजारी नाहीत. त्या दोघांच्यामध्ये अनेक इस्लामिक राष्ट्र आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील युद्ध हे थेट जमिनीवर लढले जाणार नाहीत. ते केवळ हवाई हल्ले करूनच लढले जात आहे.

follow us