Ali Larijani : इराणला सर्वात मोठा धक्का, सुरक्षा प्रमुख अली लारिजानी इस्त्रायली हल्ल्यात ठार

Ali Larijani :  गेल्या 19 दिवसांपासून सुरु असणाऱ्या इराण इस्त्रायल युद्धातून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायलने मोठी कारवाई करत

Ali Larijani

Ali Larijani

Ali Larijani :  गेल्या 19 दिवसांपासून सुरु असणाऱ्या इराण इस्त्रायल युद्धातून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायलने मोठी कारवाई करत इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांना हल्ल्यात ठार केले आहे. याबाबत आता इराणकडून पुष्टी करण्यात आली आहे.  इराणची प्रगती आणि ‘इस्लामिक क्रांती’च्या वाटचालीसाठी आयुष्यभर संघर्ष केल्यानंतर डॉ. अली लारीजानी यांचं निधन झालं असल्याची माहिती इराणकडून देण्यात आली आहे.

28 फेब्रुवारी रोजी अमेरिका (America) आणि इस्त्रायल (Israel) यांच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर युद्धविषयक मोहिमांचे व्यवस्थापन सुरक्षा प्रमुख अली लारीजानी (Dr. Ali Larijani) यांच्याकडे होते. लारीजानी हे इराणच्या राजकीय आणि सुरक्षा यंत्रणेतील अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. ते इराणच्या (Iran) ‘सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदे’चे सचिव म्हणून कार्यरत होते आणि देशाची धोरणात्मक रणनीती निश्चित करण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात असे. यापूर्वी, त्यांनी इराणच्या संसदेचे (मजलिसचे) अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते.

मंगळवारी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्याकडून अली लारीजानी यांना ठार मारल्याचा दावा करण्यात आला होता. आज सकाळी आम्ही अली लारीजानीचा खातमा केला आणि त्याच्यासोबतच आम्ही ‘बसिज दला’च्या कमांडरलाही कंठस्नान घातले. हे दोघेही ‘गुन्हेगारांचे साथीदार’ होते, जे तेहरानच्या रस्त्यांवर आणि इराणच्या इतर शहरांमध्ये सामान्य जनतेला दहशतग्रस्त करत होते असं बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.

सहावीतील विद्यार्थीनीवर ॲसिड हल्ला, नेमकं काय घडलं? मुलीची पहिली प्रतिक्रिया…

कोण होते अली लारीजानी?

इराणचे सुरक्षा प्रमुख आणि ‘सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदे’चे सचिव अली लारीजानी यांचा जन्म इराकच्या नजफ शहरात झाला होता. त्यांनी तेहरान विद्यापीठातून ‘पाश्चात्य तत्त्वज्ञाना’मध्ये (Western philosophy) उच्च शिक्षण घेतले होते. लारिजानी यांनी 2008 ते 2020 या कालावधीत ‘मजलिस’ म्हणजेच इराणच्या संसदेचे अध्यक्ष (स्पीकर) म्हणून कार्यभार सांभाळला. या कार्यकाळात, त्यांनी कायदे निर्मितीमध्ये आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत इराणची रणनीती आखण्यामध्ये सक्रिय भूमिका बजावली.

Exit mobile version