Iran Ballistic Missile : इस्लामिक देश इराणने (Iran)नुकतीच दोन हजार किलोमीटरवरुन पल्ल्याच्या पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची (Ballistic Missile)यशस्वी चाचणी केली आहे. इराणच्या अधिकृत शासकीय माध्यमांनी याला दुजोरा दिला आहे. हे क्षेपणास्त्र सौदी अरेबियापासून (Saudi Arabia)इस्त्रायल (Israel)आणि मध्य पूर्व भागातील अमेरिकन (America)ठिकानांना लक्ष्य करु शकते. इराणचे अमेरिका आणि इस्रायलशी जुने वैर आहे. त्यामुळे या यशस्वी चाचणीमुळे एकप्रकारे जागतिक वातावरण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
‘लोकं फेसबुक लाइव्ह करणाऱ्या माणसाला मदत करतील का?’ शिंदेंचा खोचक सवाल
इस्रायलच्या सशस्त्र दलाच्या प्रमुखाने तेहरानच्या आण्विक कार्यक्रमावर कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर दोन दिवसांतच इराणकडून क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली आहे. मध्यपूर्वेत इराणकडे सर्वाधिक क्षेपणास्त्रं आहेत. इराणचे म्हणणं आहे की, त्यांची शस्त्रे या भागातील इस्रायल आणि अमेरिकेच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यास सक्षम आहेत.
तेहरानने म्हटलं आहे की, ते युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन देशांच्या विरोधाला न जुमानता आपला संरक्षणात्मक क्षेपणास्त्र कार्यक्रम चालू ठेवणार असून त्यात कायम अपग्रेड करत राहिल असंही त्यांनी म्हटलंय.
इराणचे संरक्षण मंत्री मोहम्मदरेझा अष्टियानी म्हणाले की, इराणच्या शत्रूंना आमचा संदेश हा आहे की, आम्ही देश आणि त्याच्या संसाधनांचं रक्षण करु असं ते म्हणाले. आमच्या मित्रांना आमचा संदेश हा आहे की आम्हाला प्रादेशिक स्थिरतेसाठी मदत करायची आहे, असंही ते म्हणाले आहेत.
इराणच्या सरकारी टीव्हीवर प्रदर्शित केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये इराणच्या खोरमशहर 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती दाखवण्यात आली आहे. त्याचा पल्ला दोन हजार किलोमीटर आहे (1,243 मैल) आहे. हे 1,500 kg (3,300 पाऊंड) वॉरहेड वाहून नेऊ शकते. राज्याच्या वृत्तसंस्थेने या क्षेपणास्त्राचे नाव खैबर असल्याचे म्हटले आहे.