Download App

Iran Attacks Pakistan : इराणचा पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक; दहशतवाद्यांचा अड्डा उद्धवस्त

Iran Attacks in Pakistan : इराणने काल इराक आणि सीरियात मिसाईल हल्ले (Iran Attacks Pakistan) करून खळबळ उडवून दिल्यानंतर आपला मोर्चा पाकिस्तानकडे वळवला आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीतून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी इराणने थेट (Iran) पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश अल अदलचे अड्डे उद्धवस्त करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यांत अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा इराणच्या सैन्याने केला आहे. दुसरीकडे या हल्ल्यांत अनेक निरपराध लोकांचा बळी गेल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. एकूणच अवघ्या जगालाच डोकेदुखी ठरत चाललेल्या पाकिस्तानला इराणने पुन्हा एकदा धडा शिकवला आहे.

इराण आणि पाकिस्तानच्या सीमा जवळ आहेत. त्यामुळे दोन्ही देशांत नेहमीच तणाव असतो. त्यातही पाकिस्तानातील दहशतवादी इराणमध्ये हल्ले घडवत असतात. या मुद्द्यावर दोन्ही देशांत वाद सुरू आहेत. इराणने याआधीही अशा प्रकारे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले आहेत. मात्र तरीही पाकिस्तानची अक्कल ठिकाण्यावर आली नाही. त्यामुळे आता इराणने पुन्हा एकदा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

Iran Hits Iraq : इराणचा इराक-सीरियावर मिसाईल हल्ला; युद्धाच्या ठिणगीने तणाव वाढला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणच्या सैन्याने मंगळवारी रात्री पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. या भागात दहशतवादी संघटना जैश अल अदलचे मुख्यालय होते. या मुख्यालयासह अतिरेक्यांचा आणखी एक अड्डा इराणने उद्धवस्त केला. या संघटनेने मागील काही दिवसांत इराणमध्ये दहशतवादी हल्ले केले होते. यावरून इराणने पाकिस्तानला इशाराही दिला होता. तरीदेखील हल्ले काही थांबले नव्हते. त्यामुळे संतापलेल्या इराणने पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला आहे. या संघटनेने इराणमधील एका पोलीस चौकीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 14 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचाच बदला घेण्यासाठी इराणने  पाकिस्तानात ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

इराणचे इराक-सीरियात मिसाईल हल्ले 

इराणच्या रिवॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRCG) निवेदनाच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की इराकी कुर्दिस्तानची राजधानी अर्बिलमध्ये एक गुप्तहेर मुख्यालय आणि इराणविरोधी आतंकवादी संघटनांच्या ठिकाणांना नष्ट करण्यात आले. या हल्ल्यां चार लोकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. इराकच्या कुर्दिस्तान सुरक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यांत चार लोक ठार झाले आहेत तर सहा जण जखमी झाले आहेत. कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पार्टीने सांगितले की मारल्या गेलेल्या नागरिकांत येथील प्रमुख्य उद्योजक आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सहभाग आहे.

follow us

वेब स्टोरीज