Pakistan News : दहशतवादी हाफिजला भारताच्या ताब्यात देणार का? पाकिस्तानचं उत्तर मिळालं
Pakistan News : भारताचा शत्रू आणि 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला (Hafiz Saeed) भारतात आणण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, अशी मागणी भारताने पाकिस्तानला (Pakistan News) केली होती. भारत सरकारने (Government of India) त्याला परत आणण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींचा पूर्तता देखील केली आहे. मात्र पाकिस्तानने भारताची ही मागणी फेटाळून लावल्याची माहिती हाती आली आहे.
इंडियन एक्सप्रेसने पाकिस्तानमधील डॉन या वेबसाइच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. पाकिस्तान सरकारच्या विदेश मंत्रालयाने भारत सरकारची ही मागणी फेटाळून लावली आहे. विदेश कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलूच म्हणाल्या की, हाफिज सईदला सुपूर्द करण्याची मागणी भारतीय अधिकाऱ्यांनी केली होती. लक्षात घेतलं पाहिजे की भारत आणि पाकिस्तान दरम्यान प्रत्यार्पणाबाबत कोणताही करार झालेला नाही. त्यामुळे हाफिज सईदचे प्रत्यार्पण शक्य नाही.
दहशतवादी हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी
या प्रकरणी तज्ज्ञांचं म्हणणं आहे की दोन्ही देशात असा कोणताही करार झालेला नसला तरीही प्रत्यार्पण करता येऊ शकते. मात्र पाकिस्तानकडून जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे यातून दिसून येत आहे. हाफिज सईद याच्या नेतृत्वातील जमात-उद-दावा, लष्कर-ए-तैयबा या संघटनेचाच एक भाग आहे. लष्कर ए तैयबा 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना जबाबदार आहे. या हल्ल्यात सहा अमेरिकी नागरिकांसह 166 लोकांचा मृत्यू झाला होता.
जुलै 2019 मध्ये हाफिज सईदला पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. हाफिज सईद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात पाकिस्तानात 23 गुन्हे दाखल आहेत. पाकिस्तानातील न्यायालयाने या प्रकरणात एप्रिल 2022 मध्ये हाफिज सईदला तब्बल 33 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, आता पाकिस्तानने हाफिज सईदच्या प्रत्यार्पणास नकार दिला आहे. त्यामुळे हा कुख्यात दहशतवादी भारताच्या तावडीत सहजासहजी सापडणार नाही असेच दिसत आहे. या प्रकरणी आता भारत सरकार पुढे काय कार्यवाही करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Pakistan : इस्त्रायल-हमास युद्धाचा इफेक्ट! पाकिस्तानात नववर्षाच्या जल्लोषावर बंदी
दरम्यान, एलईटीची निर्मिती करणाऱ्या सईदला भारतात आणण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होऊ शकते. एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला औपचारिक विनंती पाठवली आहे. याद्वारे सईदला भारताच्या ताब्यात देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. अमेरिकेने या दहशतवाद्यावर 10 मिलियन डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र, ही पहिलीच वेळ नाही. याआधीही भारताकडून सईदला आमच्या ताब्यात द्या, ही मागणी झाली होती. पण, भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रत्यार्पण करार नसल्यामुळे या प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे.