दहशतवादी हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी

  • Written By: Published:
दहशतवादी हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी

Hafiz Saeed Extradition News : भारताचा शत्रू आणि 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या हाफिज सईदला (Hafiz Saeed) भारतात आणण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. भारत सरकारने सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, अशी मागणी पाकिस्तानकडे केल्याचे वृत्त आहे. भारत सरकारने (Government of India) त्याला परत आणण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींचा पूर्तता देखील करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र, याबाबत अद्याप दोन्ही देशांकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिदी देण्यात आली नाही.

Vijay Wadettiwar : ‘नवीन नवरदेव बाशिंग बांधून तयार’; CM बदलांच्या चर्चांवर वडेट्टीवारांचा खोचक टोला 

हाफिज सईद हा 2008 मधील 26/11 चा हल्ला आणि 2019 मधील पुलवामा हल्ल्यातील मुख्य आरोपी आहे. याशिवाय त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राने हाफिज सईदचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला आहे. तो लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. या संघटनेवर जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले केल्याचा आरोप आहे. हे हल्ले आम्हीच घडवून आणल्याचा दावाही लष्कर-ए-तोयबाने केला आहे.

कॅनडा पोलिसांचा खुलासा, निज्जरचे मारेकरी कॅनडामध्येच लपलेले, लवकरच अटक होण्याची शक्यता 

दरम्यान, एलईटीची निर्मिती करणाऱ्या सईदला भारतात आणण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होऊ शकते. एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला औपचारिक विनंती पाठवली आहे. याद्वारे सईदला भारताच्या ताब्यात देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. अमेरिकेने या दहशतवाद्यावर 10 मिलियन डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.

मात्र, ही पहिलीच वेळ नाही, याआधीही भारताकडून सईदला आमच्या ताब्यात द्या, ही मागणी झाली होती. पण, भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रत्यार्पण करार नसल्यामुळे या प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या वर्षी पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने सईदाला 32 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, तो पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे का? या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हाफिज सईदला पकडण्यासाठी 1 लाख डॉलर्सचे बक्षीस देण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे.

तलहा सईद निवडणुकीच्या रिंगणात
गेल्या वर्षीच भारताने सईदचा मुलगा तल्हा सईदला यालाही दहशतवादी जाहीर केलं. सध्या तो पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहेत. तल्हा पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग (PMML) कडून निवडणूक लढवू शकतात, असे वृत्त आहे.

भारताने पाकिस्तानकडे हाफिजला ताब्यात घेण्याची मागणी केली आहे, मात्र पाकिस्तानने त्यावर काहीही उत्तर दिलं नाही. त्यामुळं याप्रकरणी पाकिस्तानची भूमिका काय असेल? याकडे अनेक देशाचं लक्ष लागलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज