Iran Hits Iraq : इराणचा इराक-सीरियावर मिसाईल हल्ला; युद्धाच्या ठिणगीने तणाव वाढला

Iran Hits Iraq : इराणचा इराक-सीरियावर मिसाईल हल्ला; युद्धाच्या ठिणगीने तणाव वाढला

Iran Hits Iraq Syria with Missiles : रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्त्रायल-हमास यांच्यातील युद्धाचा निकाल अजूनही लागलेला नाही. दुसरीकडे हूथी बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिका-ब्रिटेन सरसावले आहेत. या युद्धांमुळे जगभरात तणाव निर्माण झालेला असतानाच  (Iran Hits Iraq Syria with Missiles) आता नव्या युद्धाची चिन्हे दिसू लागली आहेत. इराणने (Iran) सोमवारी रात्री उशिरा इराक आणि सीरियाच्या (Syria) अनेक भागात मिसाईल हल्ले केले. या हल्ल्यांत अर्बिलमधील गुप्तहेरांचे मुख्यालय आणि इराणविरोधी दहशतवादी संघटनांची ठिकाणे उद्धवस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी सांगितले की इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्सने सीरिया आणि इराकच्या स्वायत्त कु्र्दिस्तान क्षेत्रात अनेक दहशतवादी ठिकाणांवर मिसाईल हल्ले केले. या हल्ल्यांमुळे या खाडी देशात आणि मध्य आशिया तणाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Israel Hamas War : पॅलेस्टीनी नागरिकांचाच हमासवर विश्वास नाही; इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा

आयआरएनए वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रिवॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRCG) निवेदनाच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे की इराकी कुर्दिस्तानची राजधानी अर्बिलमध्ये एक गुप्तहेर मुख्यालय आणि इराणविरोधी आतंकवादी संघटनांच्या ठिकाणांना नष्ट करण्यात आले. या हल्ल्यां चार लोकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. इराकच्या कुर्दिस्तान सुरक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यांत चार लोक ठार झाले आहेत तर सहा जण जखमी झाले आहेत. कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पार्टीने सांगितले की मारल्या गेलेल्या नागरिकांत येथील प्रमुख्य उद्योजक आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सहभाग आहे.

इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांत मोसाद संघटनेच्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. मोसाद या भागात गुप्त पद्धतीने माहिती गोळा करून दहशतवादी हल्ले घडवून आणत होता यामुळे संघटनेच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांतील तणाव मात्र वाढला आहे. यानंतर आता इराक आणि सीरिया इराणला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Iraq Fire Accident: इराकमध्ये लग्नमंडपात मृत्यूचं तांडव; 100 जणांचा मृत्यू तर 150 हून अधिक जखमी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube