Russia Ukraine War : रशियाचा मोठा हल्ला! युक्रेनवर 36 ड्रोन, 122 क्षेपणास्त्र डागली, 27 जणांचा मृत्यू

Russia Ukraine War : रशियाचा मोठा हल्ला! युक्रेनवर 36 ड्रोन, 122 क्षेपणास्त्र डागली, 27 जणांचा मृत्यू

Russia Ukraine War : रशिया आणि यु्क्रेन यांच्यात मागील दोन वर्षांपासून युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. काल या युद्धाचा मोठा भडका उडाला. मागील काही दिवसांपासून रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला नव्हता. मात्र, काल रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला. युक्रेनवर तब्बल 122 क्षेपणास्त्र डागण्यात आली. तसेच 36 ड्रोन हल्ले केले. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यात युक्रेनमधील 27 नागरिकांचा बळी गेला आहे. युद्धाच्या दोन वर्षांच्या काळात रशियाने युक्रेनवर केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. रशियाच्या या हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने मिसाईल हल्ला करण्यात आल्याने युक्रेनमध्ये मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Russia : पुतिन यांचे कट्टर विरोधक नवलनी तुरुंगातून बेपत्ता; नेमकं काय घडलं रशियात?

युक्रेनच्या सैन्यदलाचे प्रमुख वलेरी जालुजनी यांनीही या हल्ल्याची माहिती दिली. रशियाचे बहुतांश हल्ले हवेतच हाणून पाडण्यात आले. 87 क्षेपणास्त्रं आणि 27 ड्रोन नष्ट करण्यात आले. या मोठ्या हल्ल्यात 27 युक्रेना नागरिकांचा मृत्यू झाला असून 130 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचे समोर येत आहे. हल्ला मोठा असल्याने मृतांची संख्या आणखी वाढू शकते. या हल्ल्यानंतर रशियाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. त्यांच्याकडून या हल्ल्याची जबाबदारी अद्याप स्वीकारण्यात आलेली नाही.

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की तब्बल 18 तास हा हल्ला सुरुच होता. या हल्ल्यात 144 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. इमारतींच्या ढिगाऱ्याखालीही अनेकजण अडकले असून त्यांची संख्या अजूनही समोर आलेली नाही. युक्रेनमध्ये इमारती, रुग्णालये, अपार्टमेंट्स आणि शाळा जमीनदोस्त झाल्या आहेत. युक्रेनचे सैन्य प्रमुखांनी या माहितीला दुजोरा दिला.

रशियाला झटका! युद्ध अजून लांबणार? अमेरिकेने युक्रेनसाठी घेतला ‘हा’ निर्णय

याआधी नोव्हेंबर 2022 मध्ये रशियाने मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात तब्बल 96 क्षेपणास्त्र रशियाने डागली होती. मार्चमध्येही मोठा हल्ला केला होता. त्यावेळी 81 क्षेपणास्त्रांचा मारा रशियाने केला होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले की रशियन सेनेने बॅलेस्टिक आणि क्रूज क्षेपणास्त्रांसह विविध प्रकारच्या हत्यारांनी हल्ला केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज