Russia : पुतिन यांचे कट्टर विरोधक नवलनी तुरुंगातून बेपत्ता; नेमकं काय घडलं रशियात?

Russia : पुतिन यांचे कट्टर विरोधक नवलनी तुरुंगातून बेपत्ता; नेमकं काय घडलं रशियात?

Russia News : भारताचा मित्र देश रशियात निवडणुकांचे वारे (Russia News) वाहत आहेत. येथे निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे येथील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, त्याआधीच महत्वाची बातमी समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचे कट्टर विरोध एलेक्सी नवलनी तुरुंगातून गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नवेलनी यांच्या वकिलांनी सांगितले की मागील सात दिवसांपासून त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. कैद्यांच्या यादीतूनही त्यांचं नाव गायब आहे. नवलनी (Alexeni Navalny) भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत होते. आता मात्र निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नवलनी तुरुंगातून बेपत्ता झाले आहेत. यामागे नेमकं काय कारण आहे, याची खात्रीशीर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Israel Hamas War : अमेरिकेच्या ‘त्या’ प्रस्तावाविरोधात मतदान; रशिया-चीनच्या खेळीनं भडकला इस्त्रायल

नवलनी यांना याच वर्षातील ऑगस्ट महिन्यात तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. नवलनी यांचे प्रवक्ते किरा यर्मिश यांनी आरोप केला की अनेक वेळा प्रयत्न करूनही वकिलांना नवलनी यांची भेट घेऊ दिली जात नव्हती. तसेच त्यांना सांगण्यात आले होते की नवलनी तुरुंगात नाहीत. त्यांनी सोशल मीडिया एक्सवर लिहिले की, वकिलांना सांगण्यात आले की कैद्यांच्या यादीत अॅलेक्सी नवलनी यांचे नाव नाही. तुरुंगातील ज्या कोठडीत नवलनी यांना डांबण्यात आले होते तेथे जाण्याचा प्रयत्न वकिलांनी केला त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की नवलनी येथे नाहीत. नवलनी मागील सहा दिवसांपासून बेपत्ता आहेत. नवलनी यांना कुठे नेण्यात आले याचे उत्तरही प्रशासनाने दिले नाही. या दरम्यान, मॉस्को टाइम्स वृत्तपत्राने नवलनी यांच्या टीमच्या हवाल्याने वृत्त दिले की, तुरुंगात असलेल्या नवलनी यांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला.

नवलनी आधीच फसवणूक आणि अन्य आरोपांमुळे साडे अकरा वर्षांची शिक्षा भोगत होते. मात्र, त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. त्यांना आयके 6 कॉलनी येथे कैद करण्यात आले होते. नवलनी यांच्या समर्थकांचा आरोप आहे की त्यांची कैद आणि शिक्षा म्हणजे निव्वळ राजकारण आहे. पुतिन यांच्या विरोधात उठणारा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप नवलनी यांच्या समर्थकांनी केला.

रशियात आल्यानंतर थेट तुरुंगात रवानगी 

जानेवारी 2021 मध्ये रशियात परतल्यानंतर नवलनी यांना 2013 मधील त्यांच्याविरोधात असलेल्या फसवणुकीच्या आरोपांखाली अटक करण्यात आली होती. नवलनी यांनी तुरुंगात असतानाही युक्रेनविरोधात रशियाने सुरू केलेल्या युद्धाविरोधात अभियान सुरू केले होते. रशियाच्या प्रशासनाने त्यांच्यावर केलेले आरोप त्यांनी मान्य केलेले नाहीत. आता तर नवलनी तुरुंगातच नसल्याची बातमी समोर आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज