Russia Wagner Rebel: रशियाला मिळणार नवा राष्ट्राध्यक्ष; शिलेदाराचा पुतिन यांच्याविरोधात शड्डू
Wagner Rebellion: एकेकाळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असलेले येवगेनी प्रिगोझिन यांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. वॅग्नर ग्रुपच्या प्रमुखाने पुतिन यांना सत्तेवरून उलथवून टाकण्याची धमकी दिली आहे. ज्याच्या प्रत्युत्तरात पुतिन यांनी वॅगनर ग्रुपला चिरडण्याचे आदेश दिले आहेत. पुतीन यांच्या या वक्तव्यावर प्रीगोझिन यांनी म्हटले आहे की, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी चुकीचा पर्याय निवडला आहे आणि देशाला लवकरच नवीन राष्ट्रपती मिळणार आहे.
येवगेनी प्रिगोझिन यांच्या नेतृत्वाखालील वॅगनर गटाच्या तरुणांनी दोन रशियन शहरांवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. यासोबतच वॅगनर गटाने दावा केला आहे की त्यांच्या सैनिकांनी तीन रशियन हेलिकॉप्टर पाडले आहेत.
वॅगनर ग्रुपच्या बंडानंतर राष्ट्राला संबोधित करताना, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की वॅग्नरने कठीण काळात रशियाचा विश्वासघात केला आणि सैन्याचा अवमान केला. सैन्याविरुद्ध शस्त्र उचलणारा प्रत्येकजण देशद्रोही आहे. ते पुढे म्हणाले की प्रीगोझिनने रशियाचा “विश्वासघात” केला आहे. हा आपल्या लोकांच्या पाठीवर वार करण्यासारखा आहे. वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांनी पाठीत वार केले. ते म्हणाले की रशिया आपल्या भविष्यासाठी पूर्ण ताकदीने लढत आहे. आमचे उत्तर आणखी कठोर असेल.
दोन पिढ्यांची अनोखी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आठवणी’ चा ट्रेलर रिलीज
आपल्या भाषणादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, देशाच्या सैन्याविरोधात कोणीही शस्त्र उचलले असेल तर त्याला शिक्षा होईल. ते आपल्याला पराभवाकडे आणि शरणागतीकडे ढकलत आहेत. ते पुढे म्हणाले की, संविधान आणि जनतेच्या रक्षणासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. यासोबतच त्यांनी लष्कराच्या कमांडर्सना बंडखोरांना ठार मारण्याचे आदेश दिले आहेत.
Wagner Rebel : रशियात अंतर्गत युद्ध शिगेला; बंडखोरी करणाऱ्यांना संपण्याचे पुतिन यांचे आदेश
पुतीन म्हणाले की, जेव्हा रशिया आपल्या भविष्यासाठी सर्वात कठीण लढाई लढत आहे, त्याचवेळी आमचा विश्वासघात झाला. पश्चिमेकडील संपूर्ण लष्करी, आर्थिक आणि माहिती यंत्रणा आमच्या विरोधात झाली आहे.