Ukraine Russia War : एक वर्ष पूर्ण, लाखो लोकांना फटका, किती जीव गमावले?

  • Written By: Published:
Ukraine Russia War : एक वर्ष पूर्ण, लाखो लोकांना फटका, किती जीव गमावले?

Ukraine Russia War : जागतिक राजकारणावर मोठा परिणाम करणाऱ्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारी रोजी रशियन सैन्याने युक्रेनवर तीन बाजूंनी जोरदार हल्ला केला होता. युक्रेनची राजधानीवर ताबा मिळवून झेलेन्स्कीची सत्ता उलथून टाकण्याचा रशियाचा प्रयत्न होता. जिथे रशियाने यासाठी लाखो सैनिक उभे केले, तिथे क्षेपणास्त्रांचा वर्षाव करून युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली. आज, युद्धाच्या १ वर्षानंतरही रशिया अजूनही युक्रेनमधील आपल्या ध्येयापासून दूर आहे.

युद्धाचे जागतिक राजकारणावर मोठे परिणाम झाले असले तरी युद्धामध्ये लाखो सैनिकांना मृत्यूला सामोरं जावं लागत. या युद्धात रशियाचे १.८० लाख आणि युक्रेनचे १ लाख सैनिक मारले गेले असतील किंवा जखमी झाले असतील, असे पाश्चात्य देशांच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. युक्रेनने २३ फेब्रुवारीपर्यंत रशियाच्या १,४५,८५० सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. पण युक्रेनने कधीही आपल्या सैनिकांच्या मृत्यूची संख्या जाहीर केली नाही.

रशियाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लष्करी मृत्यूची अधिकृत आकडेवारी दिली होती. तेव्हा रशियाने सांगितले होते की या युद्धात त्यांचे सुमारे ६ हजार सैनिक मारले गेले आहेत. पण रशियाच्या न्यूज वेबसाइट मॉस्को टाईम्सने सांगितले आहे की १७ फेब्रुवारी २०२ पर्यंत रशियाचे १४,७०९ सैनिक मारले गेले आहेत.

हेही वाचा : आता ‘हे’ असणार शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय, पक्षाच्या पत्रकात दिला पत्ता

सर्वसामान्यांवर नागरिकांना मोठा फटका

युद्धाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. २१ फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्राने या युद्धात सामान्य नागरिकांच्या नुकसानीची आकडेवारी शेअर केली होती. या युद्धात युक्रेनमध्ये एका वर्षात ८००६ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. याशिवाय १३ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. एवढेच नाही तर या युद्धात ४८७ मुलांचा मृत्यू झाला असून ९५४ गंभीर जखमी झाले आहेत. प्राण गमावलेल्यांमध्ये ६० टक्के पुरुष आणि ४० टक्के महिला होत्या.

एक वर्षांपूर्वी झाली होती सुरुवात

आज एक वर्षाआधी पुतिन यांच्या घोषणेनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही टीव्हीवर येऊन जनतेला संबोधित केले होते. पुतिन यांनी युद्ध घोषित केले तेव्हा युक्रेनचा काही दिवसांत पराभव होईल असे वाटत होते पण या युद्धाला आज एक वर्ष पूर्ण झालं. या एका वर्षात कोणीही जिंकले नाही. कोणीही हरले नाही फक्त शहरामागून शहरे उद्ध्वस्त झाली आहेत.

हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. जे वाचले आहेत ते निर्वासित म्हणून आपले जीवन व्यतीत करत आहेत. रशिया मागे हटण्यास तयार नाही. युक्रेन देखील युद्धाचा सामना करित आहे. या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही खोलवर परिणाम झाला

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube