Iran Israel War : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार इराणने इस्रायलवर (Israel) मिसाईल हल्ला केला आहे. इराणने इस्रायलवर 100 पेक्षा जास्त मिसाईल डागली असल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायली सुरक्षा दलांनी याला दुजोरा दिला आहे. इराणच्या मिसाईल हल्ल्यानंतर इस्रायली नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे.
मंगळवारी अमेरिकन अधिकाऱ्याने इराण (Iran) बॅलेस्टिक मिसाईलने इस्रायलवर हल्ला करण्याची तयारी करत आहे असा इशारा दिला होता. याबाबत इस्रायली सैन्याने म्हटले आहे, इराणने इस्रायलवर 100 हून अधिक मिसाईल डागली आहे आणि सध्या संपूर्ण देशात हवाई हल्ल्याचे सायरन वाजत आहेत. आम्ही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवत आहे.
⭕️ IDF: A short while ago, missiles were launched from Iran towards the State of Israel.
Israelis are instructed to remain alert and precisely follow the Home Front Command’s instructions
In the last few minutes, the Home Front Command has distributed life-saving instructions…
— Israel Foreign Ministry (@IsraelMFA) October 1, 2024
तर दुसरीकडे इराणने जर इस्रायलवर हल्ला केला तर याचा परिणाम गंभीर होईल असा इशारा इस्रायलने दिला होता त्यामुळे इस्रायलही इराणला प्रत्युत्तर देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 01 ऑक्टोबर रोजी इस्रायलने लेबनॉनमध्ये जमिनीवर कारवाई सुरू केली आहे त्यामुळे लेबनॉनमधील तब्बल 24 शहरांना धोक्का असल्याचं बोललं जात आहे.
This morning, US President Biden convened a meeting with Vice President Kamala Harris and their national security team to discuss Iranian plans to imminently launch a significant ballistic missile attack against Israel. They reviewed the status of US preparations to help Israel…
— ANI (@ANI) October 1, 2024
आयडीएफने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काही वेळापूर्वी इराणकडून इस्रायलच्या दिशेने मिसाईल डागण्यात आले आहे. आम्ही होम फ्रंट कमांडच्या सूचनांचे योग्य प्रकारे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. IDF इस्त्राईल राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे आणि करत राहील.असं आयडीएफने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
In view of the prevailing situaton in the region, all Indian nationals in Israel are advised to stay vigilant and adhere to the safety protocols as advised by the local authorities…In case of any emergency, please contact the 24×7 helpline of the Embassy: Embassy of India in… pic.twitter.com/G4JXyrDIFX
— ANI (@ANI) October 1, 2024
तर इस्रायलची राजधानी तेल अवीवजवळील जाफा येथे देखील गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात 12 लोक जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे तर 4 जणांचा मृत्यूही झाला आहे असं सांगण्यात येत आहे.
देणार म्हणजे देणार हा अजितदादांचा वादा, लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार 3 हजार