इराणचा अणुकार्यक्रम अजून संपलेला नाही; अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालाने ट्रम्पचं गुपित उघड

Iran Israel War : अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दावा केला होता की हा कार्यक्रम पूर्णपणे नष्ट झाला आहे. परंतु एका नवीन गुप्तचर अहवालात असे उघड झाले आहे की इराणच्या अणुकार्यक्रमावर फक्त काही महिन्यांसाठीच परिणाम झाला आहे. अहवालात फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान (Iran Israel War) सारख्या अणुस्थळांना झालेल्या नुकसानाची पुष्टी करण्यात आली आहे, परंतु ती पूर्णपणे नष्ट झालेली नाहीत.
इराण आणि इस्रायलमधील १२ जून रोजी सुरू झालेल्या युद्धाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली होती. याआधी अमेरिकेने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला केला होता. ट्रम्प यांनी दावा केला होता की, युद्ध थांबल आहे. पुढच्या काही वेळात इराण युद्ध बंदीमध्ये सामिल होईल. मात्र, असं काही झालं नसल्याचा धक्कादाय रिपोर्ट समोर आला आहे. ही युद्धबंदी काही महिन्यांसाठीच असल्याचं समोर आलं आहे.
या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दावा केला की, इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे नष्ट झाला आहे. मात्र, ट्रम्प यांचा दावा खोटा आहे. एका गुप्तचर अहवालात असं उघड झालं आहे की, हा अणुकार्यक्रम पूर्णपणे नष्ट झाला नाही, तर काही महिन्यांसाठी तो स्थगित आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर अमेरिकेच्या दाव्यावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अहवालात असं उघड झाले आहे की फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील अणुस्थळांचं नुकसान झालं आहे. परंतु, ते नष्ट झालेले नाहीत.
मोठी बातमी! इराण अन् इस्रायलमध्ये युद्धबंदी; अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
युद्ध सुरू होताच अमेरिकेने स्पष्ट केलं होतं की, ते इराणला अण्वस्त्रे बनवू देणार नाहीत. यासोबतच अमेरिका उघडपणे इस्रायलच्या बाजूने उभी असल्याचं दिसून आलं. यासोबतच अमेरिका कधीही या युद्धात उडी घेऊ शकते हे स्पष्ट झालं. यामुळेच इराणही सावध राहिला. हल्ल्यापूर्वी अण्वस्त्र कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणांहून युरेनियम काढून टाकण्यात आलं. अनेक अहवालांमध्ये असं म्हटलं जात आहे की इराणने आधीच त्याच्या ठिकाणांमधून सुमारे ४०० किलो युरेनियम काढून टाकलं आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी या अहवालाबद्दल सांगितलं की, “हे कथित मूल्यांकन लीक करणं म्हणजे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अपमानित करण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा तुम्ही चौदा ३०,००० पौंड वजनाचे बॉम्ब लक्ष्यावर टाकता तेव्हा काय होतं हे सर्वांना माहिती आहे, ते पूर्णपणे नष्ट होतं.
अमेरिकेसोबतच आखाती देशांनाही कोणत्याही परिस्थितीत इराणकडे अण्वस्त्रे असावीत असे वाटत नाही. अमेरिकेने स्पष्टपणे म्हटले आहे की इराण अण्वस्त्रे बनवू शकत नाही. हल्ल्यानंतर ट्रम्प यांचे दावे आणि अहवाल समोर आल्यानंतर असे म्हटले जात आहे की येत्या काळात इराण पुन्हा एकदा आपला अण्वस्त्र कार्यक्रम सुरू करू शकतो. तथापि, इस्रायलने स्पष्ट केले की जर इराणने पुन्हा अण्वस्त्रे सुरू केली तर त्याच्यावर पुन्हा हल्ला केला जाईल.
इराण आणि इस्रायलमध्ये बऱ्याच काळापासून तणाव आहे. १२ जून रोजी या तणावाचे रूपांतर संघर्षात झाले. दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये ६०० हून अधिक लोक मारले गेले, तर हजारो जखमी झाले. १८ तारखेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले होते की ते पुढील २ आठवड्यात इराणवर हल्ला करायचा की नाही याचा विचार करतील. तथापि, ट्रम्प यांच्या विधानानंतर अवघ्या ७२ तासांत अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केला.