Iran’s Supreme Leader Mojtaba Khamenei also dead? Posters put up in Mashhad city create a stir : अमेरिका आणि इस्त्रारायलने इराण विरुद्ध सुरू केलेल्या युद्धामुळे सुरुवातीलाच मृत्यू झालेल्या इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्यानंतर आता इराणचे दुसरे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेईं यांच्या देखील मृत्यूची शक्यता वर्तवली जात आहे. याचे एक पोस्टर इराणमधील मशहद शहरामध्ये लावण्यात आलं होतं त्यानंतर अनेक तर्क वितर्कांना उधान आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
इराणमधील मशहद शहरामध्ये एक भलं मोठं पेंटिंग काढण्यात आलं आहे. यामध्ये युद्धामध्ये आत्तापर्यंत मारल्या गेलेल्या इराणच्या सैन्यातील अधिकारी आणि राजकीय नेते यांचे चित्र काढण्यात आले आहेत. यामध्येच मोज्तबा खामेनेई यांचे वडिल अली खामेनेई आणि मोज्तबा खामेनेईं यांचे देखील पेंटिंग काढण्यात आले आहे. सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगारवाढ तात्काळ सुरू करण्याचे सरकारचे कडक निर्देश
दरम्यान 28 फेब्रुवारीला म्हणजे युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रारायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये मोज्तबा खामेनेई यांचे वडिल आणि इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मोज्तबा खामेनेईंना सर्वोच्च नेता करण्यात आलं. मात्र त्यानंतर ते कुठेही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणतंही महत्त्वाचं विधान करताना किंवा देशाला संदेश देताना समोर आलेले नाहीत. त्यामुळे त्यातच हे समोर आलेले पेंटिंग ते जिवंत आहेत का की त्यांचा मृत्यू झाला आहे? याची शक्यता आणखी बळवणारं आहे.
आज वैशाख शुद्ध एकादशी; कसं आहे बाराही राशींचं राशीभविष्य जाणून घ्या सविस्तर…
