Download App

Iraq University Fire : इराकमध्ये वसतिगृहाला भीषण आग; 14 जणांचा होरपळून मृत्यू

Iraq University Fire : इराकमधून मोठी बातमी समोर आली आहे. इराकच्या उत्तर भागातील शहर इरबिलमधील (Iraq University Fire) विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग लागली. या आगीत होरपळून 14 जणांचा मृत्यू झाला तर 18 पेक्षा जास्त जखमी झाले. ही दुर्घटना काल सायंकाळी घडली. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिले आहे. इरबिलच्या सोरन या शहरातील इमारतीला आग लागली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. इराक सरकारकडून या घटनेची माहिती देण्यात आली आहे. तसेच या घटनेची चौकशी आणि तपास करण्याचे आदेश दिले आहेत. इराकचे पंतप्रधान मसरुर बरजानी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

कर चुकवल्याप्रकरणी जो बायडेन यांचा मुलगा हंटर अडचणीत; विरोधकांनी चांगलच घेरलं

बातमी अपडेट होत आहे…

Tags

follow us