ISIS प्रमुख अबू हुसेन अल कुरेशी ठार, तुर्कस्तानकडून सीरियात घुसून ठार केल्याचा दावा

इस्लामिक अतिरेकी संघटना आयएसआयएसचा (ISIS) प्रमुख अबू हुसेन अल-कुरेशी (abu hussein al-qurashi) सीरियातील कारवाईत ठार झाल्याचा दावा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष (turkey president) रेसेप तय्यिप एर्दोगन (Recep Tayyip Erdoğan) यांनी केला आहे. याबाबत घोषणा करताना ते म्हणाले की, तुर्कीच्या लष्कराने सीरियामध्ये कारवाई सुरू केली आहे. इस्लामिक स्टेटने काही महिन्यांपूर्वी सांगितले होते की त्यांचा माजी प्रमुख अबू हसन […]

Isis

Isis

इस्लामिक अतिरेकी संघटना आयएसआयएसचा (ISIS) प्रमुख अबू हुसेन अल-कुरेशी (abu hussein al-qurashi) सीरियातील कारवाईत ठार झाल्याचा दावा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष (turkey president) रेसेप तय्यिप एर्दोगन (Recep Tayyip Erdoğan) यांनी केला आहे. याबाबत घोषणा करताना ते म्हणाले की, तुर्कीच्या लष्कराने सीरियामध्ये कारवाई सुरू केली आहे.

इस्लामिक स्टेटने काही महिन्यांपूर्वी सांगितले होते की त्यांचा माजी प्रमुख अबू हसन अल-हाशिमी अल कुरेशी मारला गेला होता, त्यानंतर अबू हुसैनने त्याची जागा घेतली होती. त्याचे सांकेतिक नाव अबू हुसैन अल कुरेशी आहे.

Google Banned Apps : गुगलकडून मोठी घोषणा, 31 मे पासून बंद होणार पर्सनल लोन देणारे APP, आत्ताच डेटा हटवा

एर्दोगन यांनी सांगितलं की, ISIS च्या संशयित नेत्यावर गेल्या काही दिवसापासून त्यांची नजर होती. ते पुढे म्हणाले की, तुर्की दहशतवादी संघटनांशी लढत आला आहे आणि यापुढेही यापुढेही लढत राहील. 2013 मध्ये तुर्कीने Daesh/ISIS ला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.

या दहशतवादी संघटनेकडून तुर्कीवर याआधी अनेकदा हल्ले केले होते. 10 आत्मघातकी हल्ल्यांमध्ये 300 हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर शेकडो जखमी देखील झालेत. त्यानंतर तुर्कीने दहशतवादी संघटनेविरोधात मोहीम सुरू केली. तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले होते की, इस्लामिक अतिरेकी पाश्चात्य देशांमध्येही कर्करोगाप्रमाणे पसरत आहे. दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी पाश्चात्य देशांनी अद्याप कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत, असे ते म्हणाले होते.

ऑपरेशन कावेरी ! सुदानमध्ये अडकलेल्या 278 भारतीयांची पहिली तुकडी जेद्दाहला रवाना

Exit mobile version