Google Banned Apps : गुगलकडून मोठी घोषणा, 31 मे पासून बंद होणार पर्सनल लोन देणारे APP, आत्ताच डेटा हटवा
Google Banned Apps: ऑनलाईन कर्ज (Online Loans) मिळवण्याचे आज अनेक पर्याय आहेत. मात्र, अशातच इन्स्टंट लोन देण्याच्या नावाने लोन अॅपकडून (Loan App) लोकांना जाळ्यात ओढलं जातं. बनावट कर्ज देणाऱ्या म्हणजेच लोन अॅपकडून कित्येकांची फसवणूक होत असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, आता गुगलने लोन अॅप्स पॉलिसीबद्दल नवीन अपडेट जाहीर केले आहे. गुगलने अनेक ऑनलाइन कर्ज देणार्या अॅप्सवर बंदी (Ban on apps) घालण्याची घोषणा केली आहे. गुगल आपल्या नवीन आर्थिक सेवा धोरणांतर्गत हे पाऊल उचलणार आहे. हे धोरण 31 मे 2023 पासून देशभरात लागू होईल.
अॅप्समधून डेटा हटवा
आजच्या आधुनिक काळात प्रत्येक जण हा सोशल मीडियावर आपला अधिक वेळ घालवतो. तसेच गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यांत कमालीची वाढ झाली आहे.
त्यामुळं Google ने नवीन आर्थिक सेवा धोरण जारी करताना जाहीर केले आहे. त्यानुसार ते 31 मे आधी प्ले स्टोअरवर उपलब्ध ऑनलाइन कर्ज देणार्या अॅप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. जर तुमच्या फोनमध्ये कर्ज देणारी अॅप्स असतील, ज्यामध्ये तुमचा वैयक्तिक डेटा सेव्ह केला असेल, तर तो डेटा डिलीट करणे किंवा 31 मे पूर्वी डेटा कुठेतरी सेव्ह करणे चांगले. तुम्ही असे न केल्यास 31 मे नंतर तुमचा वैयक्तिक डेटा हटवला जाईल.
गुगलने अॅप्सवर बंदी का घातली?
तुमच्या स्मार्टफोनमधील Apps हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. ऑनलाइन कर्ज देणाऱ्या अॅप्सवर अनेक दिवसांपासून फसवणूक होत असल्याचा आरोप होत आहे. यासोबतच युजर्सचा कॉन्टॅक्ट, लोन देणाऱ्या अॅप्सवरील फोटो डिटेल्स यासारख्या संवेदनशील डेटाची चोरी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
कळमनुरी बाजार समितीत आमदार संतोष बांगर यांना धक्का, महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
केंद्र सरकारने कडकपणा दाखवला
एवढेच नाही तर कर्ज देणाऱ्या अॅपवर कर्जदारांना त्रास दिल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. केंद्र सरकारने याबाबत कडकपणा दाखवला आहे. अशा परिस्थितीत गुगलकडून कर्ज देणारी अॅप्स मर्यादित करण्यात आली आहेत.
या अॅप्सवर युजरकर्त्यांचा संपर्क, फोटो यासारखा डेटा चोरल्याचा आरोप होता. पर्सनल लोन देणाऱ्या प्ले स्टोअरवरील अॅप्सवर निर्बंध घालून न्यायालय आणि RBI कडून दिलेल्या सावधानतेच्या इशाऱ्याला Google ने पॉसिटिव्ह प्रतिसाद दिला होता. यानंतर आता गुगलने परवाना नसलेले लोन अॅप्स गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यासाठी कडक निर्बंध घालणारे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला.
Google चे नवीन अपडेट
Google ने अशा अॅप्ससाठी वैयक्तिक कर्ज धोरण अपडेट जारी केले आहे, ज्यामुळे अनेक कर्ज देणारे अॅप्स प्ले स्टोअरवर प्रतिबंधित केले जातील. या धोरण अपडेट अंतर्गत, अॅप्सना यापुढे वापरकर्त्यांच्या एक्सटर्नल स्टोरेजमधून फोटो, व्हिडिओ, संपर्क, स्थान आणि कॉल लॉगमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार राहणार नाही.