जग हादरलं! ड्रोन हल्ल्याने इस्रायलचं विमानतळ उडवलं, हुती बंडखोरांचा सूड…

मध्यपूर्वेत इस्रायल आणि येमेनमधील हुती बंडखोर यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. हुती बंडखोरांनी इस्रायलवर थेट हल्ला चढवत रामोन विमानतळाला लक्ष्य केलं.

Israel And Huti War

Israel And Huti War

Yemen Drone Attack On Israel Airport : मध्यपूर्वेत इस्रायल आणि येमेनमधील हुती बंडखोर यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. हुती बंडखोरांनी इस्रायलवर थेट हल्ला चढवत रामोन विमानतळाला लक्ष्य केलं. येमेनहून सोडलेल्या ड्रोनच्या मदतीने हा हल्ला करण्यात आला असून विमानतळाच्या टर्मिनल भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

व्हायरल व्हिडिओ

या हल्ल्यानंतर विमानतळावरील कामकाजात मोठा अडथळा निर्माण झाला. काही काळासाठी उड्डाणे थांबवावी (Israel Airport) लागली तर काही विमानं उशिरा उड्डाण करताना दिसली. हल्ल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात (Israel And Huti War) व्हायरल होत आहेत. त्यात स्फोटाचे दृश्य आणि धुराचे लोट स्पष्टपणे दिसून येत आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनीही या (Yemen Drone Attack) घटनेची पुष्टी केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले आहेत.

इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, येमेनहून एकूण चार ड्रोन सोडले गेले होते. त्यापैकी तीन ड्रोन इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टिमने यशस्वीरित्या पाडले. मात्र चौथा ड्रोन थेट विमानतळावर कोसळला आणि त्याचा मोठा स्फोट झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वेळी अलर्टसाठी सायरन वाजलेच नाहीत. त्यामुळे नागरिकांना बंकरमध्ये लपण्याची संधी मिळाली नाही. या तांत्रिक त्रुटीची चौकशी सुरू आहे.

हल्ल्यामागचं कारण

हुती बंडखोरांनी केलेला हा हल्ला सूड म्हणून केला असल्याचं मानलं जात आहे. कारण, गेल्या आठवड्यात इस्रायलने येमेनमध्ये मोठी लष्करी कारवाई केली होती. त्यानंतर हुती गटाने सूड घेण्याची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाल समुद्रही धोक्यात

हुती बंडखोर केवळ इस्रायलवर थेट हल्ले करत नसून लाल समुद्रातील इस्रायलशी संबंधित जहाजांनाही लक्ष्य करत आहेत. त्यामुळे या प्रदेशातील आंतरराष्ट्रीय व्यापारमार्ग धोक्यात आला आहे. ड्रोन हल्ल्यांमुळे इस्रायल-हुती संघर्ष अधिकच धोकादायक टप्प्यात पोहोचला आहे. पुढे हा संघर्ष किती वाढतो, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version