Download App

Israel-Gaza Conflict: इस्राइलच्या गाझामध्ये पुन्हा बॉम्बहल्ला, 41 पॅलेस्टिनी ठार, हल्ल्याचे कारणही सांगितले

गेल्या आठवड्यात हमासकडून इस्राइलवर रॉकेट डागण्यात आले होते. त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही इस्राइलने दिला होता.

  • Written By: Last Updated:

Israel bombards Gaza 15 Palestinians killed : इस्राइलच्या (Israel) सैन्याने गाझापट्टीवर पुन्हा बॉम्बहल्ला केलाय. या क्षेपणास्त्र हल्ल्यात 41 हून पॅलेस्टिनी (Palestinians) ठार झाले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात हमासकडून इस्राइलवर रॉकेट डागण्यात आले होते. त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही इस्राइलने दिला होता. गाझापट्टीच्या भागात दहशतवादी लपलेले होते. ते रॉकेट हल्ला करत असल्याने त्यांच्यावर बॉम्ब हल्ले करण्यात आल्याचे इस्राइलच्या लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(Israel-Gaza Conflict: Israel bombards Gaza again, 15 Palestinians killed)


धमक्या देऊन महिलांना लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाला बोलावले; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

पॅलेस्टिनी न्यूज एजन्सी WAFA सांगितले की शनिवारी गाझाच्या जाविदा शहरात इस्राइलकडून हल्ला करण्यात आला आहे. त्यात हल्ल्यात 49 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. डझनभर नागरिक जखमी झाले आहेत. इस्रायलने हमासच्या हल्ल्यानंतर हे रॉकेट डागणार असल्याचे सांगितले होते, असे एजन्सीने म्हटले आहे.

Marathi Movie: ‘पायवाटाची सावली’ चित्रपटातून उलगडणार एका लेखकाच्या आयुष्यातील खडतर प्रवास

गाझाच्या काही भागात हल्ले करण्यात आहेत. झवेदाजवळील माघाजी जिल्हा खाली करण्यासाठी हा हल्ला करण्यात आलाय. या भागात हमास संघटकडून दहशतवादी रॉकेटने हल्ले करत होते, अशी माहिती इस्राइलच्या लष्करी प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. पण झवेदाचे कोणतेही क्षेत्र रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले होते का आणि तेथील लोकांना लष्कराकडून सूचना मिळाल्या होत्या का, याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.


गाझामधील 2.3 दशक्षल नागरिक विस्थापित

पॅलेस्टाइन आणि इस्राइलमधील वाद गेल्या दहा महिन्यांपासून सुरू आहे. त्यातून इस्राइलकडून गाझापट्टीवर हल्ले केले जात आहे. गाझाच्या 2.3 दशलक्ष लोकसंख्येपैकी बहुतेक लोक विस्थापित झाले आहेत. ज्यामुळे एन्क्लेव्हचा बराचसा भाग उद्ध्वस्त झाला आहे. अमेरिका, कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीने दोहा येथे युद्धविराम चर्चा शुक्रवारी थांबविण्यात आली आहे. कारण पुढील आठवड्यात इस्रायल आणि हमास यांच्यात लढाई संपवण्यासाठी आणि उर्वरित ओलीस मुक्त करण्यासाठी चर्चा होणार आहे.

follow us