Israel Hamas Conflict : इस्त्रायलने आणखी एक शत्रूला ठार केलं आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत हमासचा संघटनेचा म्होरक्या याह्या सिनवारच्या मृत्यूची घोषणा केली आहे. नेतान्याहू म्हणाले, सिनवारी मारला गेला पण युद्ध अजूनही सुरुच आहे. याआधी इस्त्रायली सैन्याने सांगितले होते की गाझात एका इमारतीत तिघे जण असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही हल्ला केला होता. हल्ल्यानंतर मृतदेहांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये चेहरा, दात, शरीर आणि हातातील घड्याळ पाहून दावा करण्यात आला की मारला गेलेला व्यक्ती हमास प्रमुख याह्या सिनवार आहे.
यानंतर डीएनए अहवालात स्पष्ट झाले की यातील मृतदेह याह्या सिनवारचाच आहे. सिनवार 1980 या दशकाच्या शेवटपासून 2011 पर्यंत इस्त्रायलच्या कैदेत होता. या दरम्यान सिनवारच्या मेंदूच्या कॅन्सरवर उपचार झाले होते. त्यामुळे इस्त्रायली अधिकाऱ्यांकडे त्याचे हेल्थ रेकॉर्ड उपलब्ध झाले होते.
Sinwar is dead: Israel PM Netanyahu confirms death of Hamas chief
Read @ANI Story | https://t.co/KfdkBEya42#Israel #Hamas #Netanyahu #Sinwar #Dead pic.twitter.com/M5Djujlc5P
— ANI Digital (@ani_digital) October 17, 2024
इस्माइल हनिये आणि हिजबुल्ला चीफ नसरल्लाह यांना ठार करण्यात आल्यानंतर इस्त्रायलचा हा प्रहार हमाससाठी आणखी एक मोठा धक्का आहे. 7 ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्याचा सर्वात मोठा मास्टरमाइंड म्हणून याह्या सिनवारकडे पाहिले जात होते. भूमिगत बंकरामध्ये लपून बसल्याने तो आजवर सुरक्षित होता असा दावा इस्त्रायली सैन्याकडून केला जात होता.
धक्कादायक! इंधनाने भरलेला टँकर उलटला; भीषण अपघातात तब्बल १४७ जणांचा मृत्यू
इस्त्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्त्रायल कार्ट्स यांनीही सोशल मीडियावर याबाबत घोषणा केली. 7 ऑक्टोबर 2023 या दिवशी इस्त्रायलमध्ये झालेल्या नरसंहारााठी जबाबदार असलेल्या याह्या सिनवारला आमच्या सैन्याने संपवलं आहे. इस्त्रायली सैन्याचे प्रवक्त्यांनीही सिनवारच्या मृत्यूला दुजोरा दिला. मागील एक वर्षापासून सुरू असलेलं आमचं अभियान आता संपलं आहे. काल इस्त्रायली सैन्याच्या एका मोहिमेत हमास चीफ याह्या सिनवारला ठार करण्यात आलं.
परराष्ट्र मंत्री काट्ज म्हणाले, सिनवारच्या मृत्यूनंतर आता हमासच्या ताब्यात असलेल्या लोकांची सुटका होण्याची शक्यता आहे. तसेच गाझात हमास आणि इराणच्या नियंत्रणाशिवाय नवीन परिस्थिती निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इस्त्रायली सैन्याने हल्ल्याची माहिती देताना सांगितले की नेहमीच्या ऑपरेशन दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की एका इमारतीत हमासचे तीन लोक लपून बसले आहेत. त्यावेळी आम्हाला माहिती नव्हतं की या तिघांत याह्या सिनवार देखील आहे. यानंतर आम्ही त्या इमारतीवर हल्ला केला. सैनिकांनी नंतर मृतदेह बाहेर काढले. त्यात एक मृतदेह याह्या सिनवारचा देखील होता. सिनवारचाच मृतदेह आहे याची खात्री करण्यासाठी डीएनए तपासणी करण्यात आली. या तपासणीतून मृतदेह याह्या सिनवारचाच असल्याचे सिद्ध झाले.
इस्त्राइलला मिळालं ‘ब्रम्हास्त्र’; अमेरिकेकडून THAAD मिसाईलची घोषणा…