इस्त्राइलला मिळालं ‘ब्रम्हास्त्र’; अमेरिकेकडून THAAD मिसाईलची घोषणा…
Isral Iran War : मागील काही दिवसांपासून हिजबुल्लाह संघटना, इस्त्राइल यांच्यातील संघर्ष तीव्र होत चाललायं. त्यातच आता या युद्धात अमेरिकेनेही (Isral Iran War) उडी घेतलीयं. अमेरिकेने इस्त्राइलमध्ये THAAD तैनात करण्याची घोषणा केलीयं. त्यामुळे आता इराण आणि हिजबुल्लाह यांच्या अडचणी वाढणार आहेत. तर इस्त्राइलला अमेरिकेकडून ब्रम्हास्त्रच मिळालंयं. अमेरिकेकडून घोषणा करण्यात आलेली THAAD यंत्रणा म्हणजे नक्की काय? याबाबत सविस्तर जाणून घेऊ..
टोल माफी ते कौशल्य विद्यापीठाला रतन टाटांचे नाव; शेवटच्या बैठकीत शिंदेंचे धडाकेबाज 19 निर्णय
THAAD म्हणजे काय?
THAAD ही एक प्रगत क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणाली आहे. या प्रणालीला टर्मिनल हाय-अल्टीट्यूड एरिया डिफेन्स असं म्हणतात. अमेरिकेने THAAD ची घोषणा केल्यामुळे इस्त्राइलची हवाई सुरक्षा मजबूत होणार असून इराणचे हल्ले रोखले जाणार आहेत. अमेरिकेने THAAD बॅटरीसह क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणाली ऑपरेट करण्यासाठी सुमारे 100 सैन्य तैनात करण्याची घोषणा केलीयं. कोणत्याही बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी अमेरिकेने THAAD ची रचना केलीयं.
Horoscope : आजचे राशी भविष्य, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात या राशीच्या लोकांवर धनाचा वर्षाव
THAAD चे वैशिष्ट्य काय आहे?
अमेरिकेची THAAD क्षेपणास्त्र प्रणाली उड्डाणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मध्यम श्रेणीची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे नष्ट करण्याचे काम करते. ‘हिट टू किल’ तंत्रज्ञानावर काम करणारी ही यंत्रणा समोरून येणारे शस्त्र थांबवत नाही तर नष्ट करते. या प्रणालीची स्ट्राइक क्षमता 200 किलोमीटर अंतरापर्यंत आणि 150 किलोमीटर उंचीपर्यंत आहे.
THAAD संरक्षण प्रणालीद्वारे, कोणतेही क्षेपणास्त्र केवळ 200 किलोमीटर अंतरावर आणि 150 किलोमीटरच्या उंचीवर नष्ट केले जाऊ शकते. या प्रणालीमध्ये, मजबूत रडार यंत्रणा असून प्रक्षेपणाच्या टप्प्यातच जवळच्या क्षेपणास्त्राचा शोध घेऊन नष्ट करते. या प्रणालीअंतर्गत एकावेळी आठ क्षेपणास्त्रे डागता येतात.
जावई समीर खान यांच्या प्रकृतीत सुधारणा; ‘त्या’ बातम्या साफ खोट्या, नवाब मलिकांचा खुलासा
THAAD कसे कार्य करते?
THAAD बॅटरीमध्ये सहा ट्रक-माउंटेड लाँचर असतात, प्रत्येक लाँचरमध्ये 8 इंटरसेप्टर्स, रडार आणि रेडिओ उपकरणे असतात. एकदा लाँचर वापरल्यानंतर तो रीलोड करण्यासाठी सुमारे 30 मिनिटे लागतात. बॅटरी चालवण्यासाठी 95 सैनिक लागतात.