Download App

Israel Hamas War : अमेरिकेपाठोपाठ रशियाचीही युद्धात एन्ट्री? थेट हमासबरोबरच वाटाघाटी

Israel Hamas War : इस्त्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) आता अधिकच चिघळले आहे. हमासचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने तुफान हल्ले सुरुच ठेवले आहेत. या युद्धामुळे जगातही दोन गट पडले आहेत. अमेरिका सरळसरळ इस्त्रायलच्या बाजूने मैदानात उतरला असून इस्त्रायलला (Israel) मदतही करत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचा कट्टर वैरी रशियाचीही या युद्धात एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे. दहशतवादी संघटना हमासने रशियाशी (Russia) संपर्क साधला आहे. हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी 200 हून आधिक नागरिकांना ओलीस ठेवलं आहे. या ओलिसांना सोडण्यासोबतच रशिया आणि हमासमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Italy PM Giorgia Meloni Breakup : ‘या’ कारणामुळे जी 20 परिषदेत चर्चेत आलेल्या इटलीच्या पंतप्रधान मेलोनींचा घटस्फोट

याआधी बायडेन यांनी इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांचीही भेट घेतली होती. यानंतर त्यांनी ट्विट करत हमासवर घणाघाती टीका केली. हमास बहुसंख्य पॅलेस्टिनी नागरिकांचे प्रतिनिधीत्व करत नाही. इस्त्रायली लोकांच्या धैर्य, शौर्याचा सन्मान करण्यासाठी मला इस्त्रायलमध्ये असल्याचा अभिमान आहे. इजिप्तच्या माध्यमातून गाझातील सामान्य नागरिकांना औषधांचा पुरवठा केला जाईल. यामध्ये इस्त्रायलही मदत करील, असे बायडेन म्हणाले होते.

या युद्धात अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेने इस्त्रायलच्या मदतीसाठी भूमध्य सागरात युद्धनौका तैनात केल्या आहेत. या युद्धनौकांवर लढाऊ विमानेही तैनात करण्यात आली आहेत. एकंदरीतच अमेरिकेचे इरादे साफ आहेत.

रशियाच्या इस्त्रायलमधी राजदूतांच्या हवाल्याने दी टाईम्स ऑफ इस्त्रायल वृत्तपत्राने म्हटले आहे, की रशिया हमासच्या संपर्कात आहे. सर्व ओलिसांची सुटका करणं हे या चर्चेमागचं मुख्य उद्दीष्ट आहे. रशियाचे राजदूत अॅनाटोली विक्टोरोव्ह यांनी सांगितले की दहशतवादी संघटनेने 200 ते 250 नागरिकांना गाझा पट्टीत ओलीस ठेवलं आहे. त्यांच्या सुटकेसाठी रशियाकडून प्रयत्न केले जात आहेत.

Israel Hamas War : युद्धाचा भडका! गाझातील हॉस्पिटलवर इस्त्रायलचा हल्ला

युद्धामुळे उपासमारीचे संकट

इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे. त्यामुळे गाझामध्ये उपासमारीचं संकट निर्माण झालं आहे. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रम या विभागाने सांगितलं.

Tags

follow us