Israel Hamas War : युद्धाचा भडका! गाझातील हॉस्पिटलवर इस्त्रायलचा हल्ला
Israel Hamas War : इस्त्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) आता अधिकच चिघळले आहे. हमासचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने तुफान हल्ले सुरुच ठेवले आहेत. आताही या युद्धाच्या मैदानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज पॅलेस्टाइनच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की इस्त्रायलने गाझा पट्टीतील अल अहली हॉस्पिटलवर हवाई हल्ला (Israel Air Attack) केला असून या हल्ल्यात 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायलने या हल्ल्याला दुजोरा दिलेला नाही. जर खरंच असा हल्ला झाला असेल तर हा सर्वात मोठा हल्ला ठरेल.
Israel Hamas War : गाझामध्ये 5 दिवस पुरेल एवढंच अन्न; उपासमारीतही हमास-इस्त्रायल युद्ध सुरूच
या हल्ल्याची अद्याप खात्री झालेली नाही. मात्र असोसिएटेड पोस्ट या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार गाझा भागातील अल अहरी या रुग्णालयावर हवाई हल्ला करण्यात आला. या रुग्णालयात मोठ्या संख्येने जखमी रुग्ण आणि पॅलेस्टिनी नागरिक आश्रयास होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत रुग्णालयाच्या इमारतीला आग लागल्याचे दिसत आहे. मृतदेह सर्वत्र विखुरल्याचेही दिसत आहे. पॅलेस्टाइनने या हल्ल्याची खात्री केली आहे. इस्त्रायली विमानांनी गाझातील अल अहली हॉस्पिटलवर बॉम्बफेक केली. या हल्ल्यात 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
युद्धामुळे उपासमारीचे संकट
इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे. त्यामुळे गाझामध्ये उपासमारीचं संकट निर्माण झालं आहे. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रम या विभागाने सांगितलं.
यावर गाझातील अधिकाऱ्यांचं म्हणण आहे की, इस्त्रायलच्या बॉम्बहल्ल्यात आता पर्यंत 2800 हून अधिक लोक मारले गेले आहेत. त्यात एक चतुर्थांश लहान मुलं आहेत. तर जखमींची संख्या 11000 च्यावर गेली आहे. त्यात रूग्णालयांची परिस्थिती भीषण असताना आता दुकानांमध्ये पुढील चार दिवसांपुरतचं अन्न शिल्लक राहिले आहे. त्या संदर्भात तेथील अधिकाऱ्यांनी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रम या विभागाला सांगितलं आहे.
Israel Palestine War : मृत्यूचं तांडव! युद्धात 4500 बळी, जखमी 12 हजार पार