Israel Hamas War : इस्त्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) आता अधिकच चिघळले आहे. हमासचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने तुफान हल्ले सुरुच ठेवले आहेत. इस्त्रायलने गाझी पट्टीतील (Gaza) रुग्णालयही सोडले नाही. रुग्णालयावरील हल्ल्यात 500 लोकांचा मृत्यू झाला. या प्रकारामु्ळे इस्त्रायलविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्याच्या झळा अमेरिकेलाही (America) बसू लागल्या आहेत. लेबनॉनमध्ये संतप्त झालेल्या जमावाने अमेरिकेच्या दूतावासाला आग लावली. यानंतर येथे उपस्थित सैनिकांनी अश्रूधुराचा मारा करत लोकांना पांगवले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.
Israel Hamas War : युद्धाचा भडका! गाझातील हॉस्पिटलवर इस्त्रायलचा हल्ला
असोसिएटेड पोस्ट या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार गाझा भागातील अल अहरी या रुग्णालयावर हवाई हल्ला करण्यात आला. या रुग्णालयात मोठ्या संख्येने जखमी रुग्ण आणि पॅलेस्टिनी नागरिक आश्रयास होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत रुग्णालयाच्या इमारतीला आग लागल्याचे दिसत आहे. मृतदेह सर्वत्र विखुरल्याचेही दिसत आहे. पॅलेस्टाइनने या हल्ल्याची खात्री केली आहे. इस्त्रायली विमानांनी गाझातील अल अहली हॉस्पिटलवर बॉम्बफेक केली. या हल्ल्यात 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
या घटनेनंतर लेबनॉन स्थित अमेरिकी दूतावासाबाहेर हजारो लोक जमा झाले. या लोकांच्या हातात पॅलेस्टाइनचे झेंडे होते. अमेरिका आणि इस्त्रायल विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात होती. या दरम्यान काही लोक संतप्त झाले आणि त्यांनी थेट दूतावासालाच आग लावून टाकली. इतकेच नाही तर काही लोकांनी येथील अमेरिकेचा फ्लॅग हटवून पॅलेस्टाइनचा फ्लॅग लावण्याचा प्रयत्न केला.
Israel Hamas War : युद्ध भडकणार! इराणने इस्त्रायलला दिली खुली धमकी
अमेरिकेने घेतला धसका
या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यानंतर अलर्ट झालेल्या अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी करत लेबनॉनचा दौरा करण्याचे टाळावे असे सांगितले आहे. या दूतावासातील कर्मचाऱ्यांनाही माघारी बोलावण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर सगळेच चित्र पालटून गेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आज इस्त्रायलला पोहोचणार आहेत. अरब देशांबरोबर त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयावरील हल्ल्यामुळे ही बैठकही रद्द करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर इस्त्रायल आणि हमास यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आता तर अशी माहिती मिळत आहे की इस्त्रायलने गाझात जमिनी हल्ल्यांची तयारी सुरू केली असून यासाठी तीन लाख सैनिकांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.