Israel Iran Conflict : इस्त्रायलकडून (Israel) शुक्रवारी इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आता इराणकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येत आहे. माहितीनुसार, इराणकडून (Iran) इस्त्रायलवर 100 ड्रोन सोडण्यात आले आहे. याबाबात माहिती देताना इस्त्रायलचे मुख्य लष्करी प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन (Efi Defrin) म्हणाले की, इराणने गेल्या काही तासांत इस्त्रायलवर 100 पेक्षा जास्त (Israel Iran Conflict) ड्रोन सोडले आहे. एअर डिफेन्स सिस्टिम हल्ले रोखण्यासाठी काम करत आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे शुक्रवार 13 जूनच्या सकाळी इस्त्रायलकडून इराणवर 100 पेक्षा जास्त ड्रोन हल्ले करण्यात आले . याबाबत माहिती देताना डेफ्रिन म्हणाले की, या कारवाईत सुमारे 200 इस्त्रायली लढाऊ विमाने सहभागी होती आणि 100 टार्गेटवर हल्ले करण्यात आले. तर दुसरीकडे इराण आणि इस्त्रायलमध्ये वाढत असणाऱ्या तणावामुळे जॉर्डनने देशाचे हवाई क्षेत्र सर्व उड्डाणांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
इराणी चीफ ऑफ स्टाफचा मृत्यू
इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या सशस्त्र दलाचे चीफ ऑफ स्टाफ जनरल मोहम्मद बघेरी यांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, बघेरी हे इराणच्या निमलष्करी दल रेव्होल्यूशनरी गार्डचे माजी टॉप कमांडर होते. इराणच्या सरकारी टीव्हीच्या वृत्तात याबाबत माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटे इस्रायलने इराणच्या राजधानीवर हल्ला केला आणि देशाच्या अणुकार्यक्रमाला टार्गेट केले. 1980 च्या दशकात इराकशी झालेल्या युद्धानंतर इस्रायलने इराणवरील हा सर्वात मोठा हल्ला मानला जातो.
तर दुसरीकडे या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी हल्ल्यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्यात येणार असं सांगितले आहे. तर या हल्ल्यात अमेरिकेचा कोणताही हात नसल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारकडून देण्यात आली आहे.