Strait of Hormuz : इस्रायल-इराण युद्ध ( Israel-Iran war) थांबविण्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. लेबनॉनवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणच्या शिष्टमंडळाने अमेरिकेसोबत सुरू असलेली चर्चा थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यात जगातील तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीला (Strait of Hormuz पुन्हा एकदा पूर्णपणे बंद करण्याची धमकी इराणने दिली आहे. (israel-iran-war-iran-warning-close-strait-of-hormuz)
‘नीट’ पेपरफुटीतील आरोपी कुलकर्णीच्या घरावर बुलडोझर; बीड पालीकेची कारवाई
यामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, इराणने केवळ होर्मुझ सामुद्रधुनीच नव्हे तर बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीसह इतर आघाड्याही सक्रिय करण्याची तयारी सुरू केलीय. लेबनानमध्ये इस्रायलने सुरू ठेवलेल्या लष्करी कारवायांच्या पार्श्वभूमीवर इराणने हा इशारा दिलाय. लेबनानमधील युद्धविरामाच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत इराणने अमेरिकेसोबत सुरू असलेल्या अप्रत्यक्ष चर्चाही तातडीने स्थगित केल्या आहेत. इराणी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, इस्रायलने गाझा आणि लेबनानमधून सैन्य माघारी घेतल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही.
लेबनानवर इस्रायली सैन्याचे सर्वात मोठे हल्ले
इस्रायल आणि त्याच्या समर्थकांना प्रत्युत्तर देण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याचा इशारा दिला आहे. तसेच शस्त्राने प्रत्युत्तर देण्याचा इसारा दिला आहे. लेबनानमध्ये इस्रायली सैन्याने गेल्या 26 वर्षांतील सर्वात मोठे हल्ले केले आहे. बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरांवरील हल्ले तीव्र केले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ले केल्याचे वृत्त आहे.
https://x.com/mb_ghalibaf/status/2061570660871073850?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2061570660871073850%7Ctwgr%5E0897ddfccdaa95dd2f4a1c4251f17756e9c3d374%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.deccanherald.com%2Fmiddle-east%2Firan-united-states-war-updates-live-israel-donald-trump-mojtaba-khamenei-us-strait-of-hormuz-west-asia-middle-east-china-iran-us-truce-crude-oil-price-surges-peace-talks-ceasefire-hezbollah-lebanon-trump-netanyahu-call-us-iran-peace-talks-hezbollah-israel-4024241
इराणने या कारवायांना “झायोनिस्ट गुन्ह्यांना दिलेले उत्तर” असे संबोधले असून संघर्षाचा नवा टप्पा सुरू होण्याचा इशाराही दिला आहे. हामुर्झची सामुद्रधुनीतून सध्या तेलाचे कंटेनर जात आहेत. त्यामुळे तेलाच्या किंमती काही प्रमाणात घसरल्या आहेत. पुन्हा हार्मुझ बंद झाल्यास क्रूड ऑइलच्या किंमती भडकू शकतात. त्याचा भारताला सर्वाधिक फटका बसू शकतो. कारण भारताला 70 ते 80 टक्के इंधन या भागातून येत आहे.
इराण युद्धात कमकुवत, ड्रम्पने पुन्हा डिवचले
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी इराणला डिवचले आहे. इराणच्या या निर्णयाबाबत मला पूर्वकल्पना नव्हती. ट्रम्प यांनी इराणला “चर्चेत कुशल, पण युद्धात कमकुवत” असे संबोधले. तसेच, त्यांच्या वक्तव्याचा अर्थ तातडीच्या लष्करी कारवाईशी जोडू नये, असे स्पष्ट करत अमेरिकेची होर्मुझ परिसरातील उपस्थिती कायम राहील, असेही त्यांनी म्हटले. यावरून अमेरिका सध्या थेट लष्करी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करत असली तरी प्रदेशातील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
