US-Israel-Iran : दोन आठवड्यांचा ‘युद्ध’विराम, पण दोन्ही देशांत नेमकं काय ठरलंय?
पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असलेला संघर्ष अखेर दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आला आहे.
US-Israel-Iran : अमेरिका-इराण (US-Israel-Iran) युद्धाला अखेर 2 आठवड्यांचा युद्धविराम मिळाला असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या अल्टिमेटमच्या अवघ्या काही तास आधीच त्यांनी युद्धाबाबत मोठा ‘यू-टर्न’ घेतला आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी 2 आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामावर (Ceasefire) झालंय. त्यामुळे आता कुठेतरी युद्ध शमवल्याचं चित्र दिसून येत आहे. मात्र, दोन्ही देशांत नेमकं काय ठरलंय. हे सविस्तर पाहूयात..
नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026’ जाहीर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरुन पाकिस्तानने दिलेल्या मध्यस्थीचा प्रस्ताव स्विकारत असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच पुढील दोन आठवड्यांमध्ये इराणने दिलेला प्रस्तावर चर्चेसाठी योग्य असून आम्ही इराणसोबत कायमस्वरुपीसाठी शांतता करार करण्यास तयार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. यासोबतच आमची सर्व लष्करी उद्दीष्टे पूर्ण केली असून इराणसोबत शांतता करार करण्याच्या आम्ही जवळ असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. तसेच वॉशिंग्टनला तेहरानकडून 10-कलमी प्रस्ताव मिळाला असून वाटाघाटी करण्यासाठी हा एक चांगला आधार आहे. जर इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकाने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितपणे पुन्हा उघडण्यास सहमती दर्शवली तरच युद्धविराम होणार असल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय.
इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी देखील या युद्धविरामाला दुजोरा दिला आहे. इराणने होर्मुजची सामुद्रधुनी 2 आठवड्यांसाठी सुरक्षित प्रवासासाठी खुली करण्याचे मान्य केले आहे. अराघची यांनी म्हटले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी सुरक्षित वाहतूक शक्य होईल, परंतु यासाठी इराणी सशस्त्र दलांशी समन्वय साधावा लागेल आणि काही तांत्रिक मर्यादांचाही विचार करावा लागेल. जर अमेरिकेने इराणवर होणारे हल्ले थांबवले, तरच इराणचे सशस्त्र दल आपली संरक्षण कारवाई थांबवेल, असंही त्यांनी नमूद केलं.
हॉर्मोनल लोचा की, भावनिक कोंडी? खरातच्या ओशनो जल अन् पेढ्यामुळे महिलांचे देहभान का हरपायचे?
इराणने आधीच स्पष्ट केले आहे की, अमेरिका आणि इस्रायल पुढील हल्ले करणार नाहीत याची हमी देणाऱ्या संपूर्ण शांतता कराराचा भाग म्हणून ते होर्मुझची सामुद्रधुनी उघडेल. केवळ तात्पुरत्या युद्धविरामाच्या बदल्यात ती उघडण्यास ते तयार नव्हते.
इराणच्या प्रस्तावात नेमकं काय?
* होरमुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे पूर्ण नियंत्रण
* इराणच्या युरेनियम संवर्धन कार्यक्रमाला अधिकृत मान्यता
* इराणवरील सर्व प्राथमिक आणि दुय्यम निर्बंधांची पूर्ण समाप्ती
* संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या सर्व ठरावांचे विसर्जन
* इराणला झालेल्या नुकसानीबद्दल आर्थिक भरपाईची तरतूद
* मध्यपूर्वेतील प्रदेशातून अमेरिकन लढाऊ सैन्याची संपूर्ण माघार
* लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील युद्ध थांबवण्याचा निर्णय
* १० एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या मध्यस्थीने चर्चा सुरु
* १५ दिवसांचा चर्चा कालावधी आणि परस्पर संमतीने मुदतवाढीची शक्यता
अमेरिकेच्या प्रस्तावात काय?
१. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ‘संपूर्ण युद्धविराम’ (Complete Ceasefire) जाहीर.
२. इराणचा सकारात्मक प्रतिसाद आणि दोन आठवड्यांसाठी युद्धबंदीची तयारी.
३. चर्चेसाठी ‘होरमुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) खुली करण्याची अट.
४. ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतीत घसरण आणि ९२ डॉलरचा स्तर.
५. जागतिक बाजारपेठेत मोठी तेजी आणि डाऊ फ्युचर्समध्ये ९०० अंकांची वाढ.
६. भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत सकारात्मक संकेत आणि मोठ्या वाढीची शक्यता.