Download App

“इस्त्रायलची मदत करू नका”, ‘त्या’ आतल्या बातमीचा सुगावा लागताच रशियाचा अमेरिकेला इशारा

इराणच्या विरोधात इस्त्रायलची लष्करी मदत करू नका, यामुळे मिडल ईस्टमध्येड अस्थिर वातावरण निर्माण होऊ शकते.

Israel Iran War Updates : इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष (Israel Iran war) दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. इस्त्रायलने तर इराणविरोधात अतिशय आक्रमक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे इराणी राज्यकर्त्यांत अस्वस्थता वाढली आहे. काहीही झालं तरी शरणागती पत्करणार नाही असा इशारा इराणने अमेरिका आणि इस्त्रायलला दिला आहे. आता या संघर्षात रशियाची एन्ट्री (Russia) झाली आहे. इराणच्या विरोधात इस्त्रायलची लष्करी मदत करू नका, यामुळे मिडल ईस्टमध्येड अस्थिर वातावरण निर्माण होऊ शकते असा इशारा रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री सर्गेई रयाबकोव यांनी दिला.

रयाबकोव पुढे म्हणाले, दोन्ही देशांतील स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. अशा परिस्थितीत (Israel Attack) जर अमेरिकेने इस्त्रायलला सैन्य मदत केली तर याचा परिणाम म्हणून अस्थिरतेचं वातावरण तयार होईल. त्यामुळे अमेरिकेने कोणत्याही परिस्थितीत इस्त्रायलची मदत करू नये असे सर्गेई रयाबकोव (Sergei Ryabkov) यांच्या बोलण्याचा आशय होता.

आज रात्री नक्कीच काहीतरी घडणार! इस्त्रायल विरुद्धच्या संघर्षात इराणच्या धमकीने खळबळ..

रशियाला कोणती बातमी कळली

इराण आणि इस्त्रायल यांच्यात संघर्ष सुरू होऊन सहा दिवस झाले आहेत. या सहा दिवसांत रशियाने उघडपणे कधीच इराणची बाजू घेतली नव्हती. तर दुसरीकडे जी 7 राष्ट्रांसह अन्य काही देशांनी इस्त्रायलला उघड पाठिंबा दिला होता. इराणकडे कोणत्याही परिस्थितीत आण्विक अस्त्रे नकोत यावर इस्त्रायल आणि अमेरिका ठाम आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनीही या गोष्टीचा पुनरुच्चार केला होता. तसेच या संघर्षात इराणने कोणतीही अट न ठेवता शरणागती पत्करावी असेही सांगितले होते. परंतु इराणने कोणत्याही परिस्थितीत शरणागती पत्करणार नाही असे ठणकावून सांगितले.

या घडामोडी घडत असतानाच अमेरिकी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची टीम इराणच्या आण्विक ठिकाणांवर आणखी हल्ले करण्यासाठी इस्त्रायलची मदत करण्याचा विचार करत आहे अशी माहिती समोर आली. या दोन्ही देशांत नक्कीच काहीतरी शिजतंय याचा सुगावा रशियाला लागला असावा. यानंतर रशियानेही या संघर्षात उडी घेत अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकार रशियाचा हा इशारा किती गांभीर्याने घेणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

खामेनेईंना मारल्यास युद्ध संपणार? उत्तराधिकारी कोण असणार? इस्त्रायलच्या विविधानाने चर्चांना उधाण

आज रात्री नक्की काहीतरी घडणार

इराणच्या सरकारी टेलिव्हिजनवरून धमकी देण्यात आल्याने तणाव अधिकच वाढला आहे. आज रात्री मोठी गोष्ट घडणार आहे. ज्याला अख्खं जग पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवील अशा भाषेत इशारा देण्यात आला आहे. पण इराण नक्की काय करणार याचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

follow us