आज रात्री नक्कीच काहीतरी घडणार! इस्त्रायल विरुद्धच्या संघर्षात इराणच्या धमकीने खळबळ..

Israel Iran Conflict : इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष (Israel Iran Conflict) दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. इस्त्रायलने तर इराणविरोधात अतिशय आक्रमक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे इराणी राज्यकर्त्यांत अस्वस्थता वाढली आहे. काहीही झालं तरी शरणागती पत्करणार नाही असा इशारा इराणने अमेरिका आणि इस्त्रायलला दिला आहे. यातच युद्धाच्या आगीत तेल टाकणारी आणखी एक कृती समोर आली आहे. खरंतर इराणने एक धमकीच दिली आहे. आज रात्री नक्कीच काहीतरी आश्चर्यकारक घडणार. ज्याला जग अनेक पिढ्यांपर्यंत लक्षात ठेवील अशी धमकावणीची भाषा इराणच्या सरकारी टिव्हीद्वारे करण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबवला तसा इराण-इस्रायलचाही थांबवू; काय म्हणाले ट्रम्प?
इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष आज सहाव्या दिवशीही सुरुच आहे. हा संघर्ष कमी होण्याची कोणतीही चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. त्यामुळे पुढील घडामोडींकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे तयार करू देणार नाही, असा इस्त्रायलचा निश्चय आहे. त्यामुळेच इराणच्या आण्विक ठिकाणांवर हल्ले करण्यात आले होते. यामुळे इराण अधिकच खवळला आहे. दोन्ही देशांत तुफान हल्ले सुरू आहेत.
JUST IN: 🇮🇷 Iranian State TV says “tonight, a great surprise will occur, one that the world will remember for centuries.” pic.twitter.com/jf9IlGgCEZ
— BRICS News (@BRICSinfo) June 17, 2025
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही (Donald Trump) इराणने विनाअट आत्मसमर्पण करावे असे आवाहन केले होते. मात्र इराण कोणत्याही परिस्थितीत शरणागती पत्करणार नाही असे इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे दोन्ही देशांतील संघर्ष इतक्यात शांत होईल याची शक्यता मावळत चालली आहे. दोन्ही देशांचे नेते एकमेकांना धमक्या देत आहेत.
यातच आता इराणच्या सरकारी टेलिव्हिजनवरून धमकी देण्यात आल्याने तणाव अधिकच वाढला आहे. आज रात्री मोठी गोष्ट घडणार आहे. ज्याला अख्खं जग पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवील अशा भाषेत इशारा देण्यात आला आहे. पण इराण नक्की काय करणार याचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
जर अमेरिका इस्त्रायलच्या बाजूने युद्धात उतरला तर अमेरिकी ठिकाणांवरही हल्ले करण्यास मागेपुढे पाहणार नाही असा इशारा इराणने दिला आहे. अमेरिकी गुप्तचर अहवालांपर्यंत पोहोच असणाऱ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इराणने काही बॅलेस्टिक मिसाइल लाँचर तैनात केले आहेत. पण या मिसाइलचे लक्ष्य अमेरिका आहे की इस्त्रायल याचा अंदाज लावणे कठीण आहे.
इस्रायल अन् इराण शांत होण्याची शक्यता मावळली; दोन्ही देशात पुन्हा युद्ध, नक्की काय घडतय?