भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबवला तसा इराण-इस्रायलचाही थांबवू; काय म्हणाले ट्रम्प?

Donald Trump on Israel-Iran Conflict : इराण आणि इस्रायल एकमेकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले-प्रतिहल्ले चढवत असताना आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवाहन केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सायंकाळी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट टाकून सदर आवाहन केले. (Iran) ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केला, त्याप्रमाणेच इराण आणि इस्रायलसाठीही प्रयत्न करू शकतो’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
इस्रायल अन् इराण शांत होण्याची शक्यता मावळली; दोन्ही देशात पुन्हा युद्ध, नक्की काय घडतय?
इराण आणि इस्त्रायलने एकमेकांशी करार करावा, ते करतील अशी खात्री आहे. ज्याप्रमाणे मी भारत आणि पाकिस्तान यांच्यात करार करायला लावला. अमेरिकेशी व्यापार करार करून दोन्ही नेत्यांनी तात्काळ निर्णय घेतला आणि संघर्ष थांबविला. मध्य पूर्वेत संघर्ष पेटला असताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पडद्याआडून ते फोनवर संपर्क साधत आहेत आणि काही बैठकाही घेत आहेत. लवकरच इराण आणि इस्रायलमध्ये शांतता प्रस्थापित होईल.
मध्य पूर्वेत संघर्ष पेटला असताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पडद्याआडून ते फोनवर संपर्क साधत आहेत आणि काही बैठकाही घेत आहेत. लवकरच इराण आणि इस्रायलमध्ये शांतता प्रस्थापित होईल. दरम्यान, भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी होण्यासाठी ट्रम्प यांनी प्रयत्न केल्याचा दावा भारताने खोडून काढला होता. भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंनी एकमेकांशी थेट संवाद साधून लष्करी कारवाई थांबविण्याबाबत निर्णय घेतला होता, असे भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीर केले होते.
श्रेय मिळत नाही
माझ्या पहिल्या कार्यकाळात सर्बिया, कोसोवो, इजिप्त आणि इथिओपिया सारख्या देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले होते, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मी खूप काही करतो, पण त्याचे श्रेय मला कधीही मिळत नाही, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.
कालच इराणला दिला होता इशारा
दरम्यान शनिवारी ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता. इस्रायलने तेहरानमधील इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाला लक्ष्य केले होते. या हल्ल्याशी अमेरिकेचा कोणताही संबंध नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला की, जर इराणने अमेरिकेवर कोणत्याही प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकन सैन्य त्याला पूर्ण ताकदीने उत्तर देईल.