Israel strikes Iran : इस्त्रायलने इराण देशावर जोरदार हल्ला (Israel strikes Iran) केलायं. इराणविरोधात इस्त्रायलने ऑपरेशन रायझिंगची घोषणा केली असून या हल्ल्यामध्ये इराणच्या सशस्त्र दलाचे चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद बाघेरी आणि जनरल हुसैन सलामी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीयं. इस्त्रायलकडून इराणच्या प्रमुख ठिकाणांवर लक्ष्य करण्यात आले असून यामध्ये सैन्याचं मुख्यालय, अण्विक स्थळांचा समावेश आहे.
Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचे पायलट सुमीत सरभवाल कोण होते?
इस्त्रायलने इराणविरोधात दुसऱ्यांदा हवाई हल्ला सुरु केला आहे. या दरम्यान, अनेक शहरांमध्ये धमाक्याचा आवाज ऐकायला येत आहे. तर या हल्ल्यानंतर इराणकडून आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांना सुरक्षित स्थळी पोहोवचण्याचं काम सुरु आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. इराणने इस्त्रायलवर मिसाईल डागले आहे. वृत्तसंस्था बीएनओच्या माहितीनुसार इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या रिवोल्युशनरी गार्डसचे प्रमुख जनरल हुसैन सलामी यांचा मृत्यू झालायं.
हल्ल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहु म्हणाले…
इराणविरोधात इस्त्रायलने ऑपरेशन रायझिंग लॉयन सुरु केलं असून आमच्या अस्तित्वासाठी संभाव्य धोक्याला संपवण्यासाठी आमचं ही मोहिम सुरु असल्याचं बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केलंय. तसेच जोपर्यंत इराणच्या अण्विक शस्त्रांचा अंत होत नाही तोपर्यंत ही मोहिम सुरुच राहणार आहे.
दादा ‘ते’ गुलाबी जॅकेट घालण्याइतकं सोप नाही…हाकेंनी पुन्हा अजित पवारांना डिवचलं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोलाल्ड ट्रम्प यांची सूचना…
मध्य पूर्वमध्ये एक भीषण संघर्ष पाहायला मिळू शकतो. हा संघर्ष आत्ताच झाला पाहिजे असं नाही, मात्र, शक्यता नाकारता येत नाही. आशिया खंडातील नागरिकांनी सतर्क राहून संभाव्य क्षेत्र सोडण्याचे निर्देशही ट्रम्प यांनी दिले आहे. जर मिसाईल डागले तर अनेकांची जीव वाचू शकतो, असं ट्रम्प यांनी म्हटलंय.