दादा ‘ते’ गुलाबी जॅकेट घालण्याइतकं सोप नाही…हाकेंनी पुन्हा अजित पवारांना डिवचलं
गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. आज पुन्हा हाकेअजित पवारांवर बोलले.
 
          Laxman Hake on Ajit Pawar : महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण हे काय गुलाबी जॅकेट घालण्याइतकं सोप नाही. अजित पवरांना मुख्यमंत्री होण्याचं गुलाबी आणि दिवा स्वप्न पडत आहेत असं म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके(Laxman Hake) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोफ डागली आहे. (Hake) गेल्या काही दिवसांपासून हाके आणि अजित पवार(Ajit Pawar) असा संघर्ष पाहायला मिळत आहे. हाके यांच्या टार्गेटवर सध्या अजित पवार असल्याचं दिसत आहे. Laxman Hake on Ajit Pawar
Video : आपण शिव, शाहु फुले आंबेडकर विचारांचेच आहोत, पण काय म्हणाले अजित पवार?
कारखानदारी, खासगी कंपन्या काढून आणि लोकांना लुबाडून मुख्यमंत्री होता येत नाही. त्यासाठी १२ ते १३ कोटी लोकांच काही दायीत्व असावं लागत असही हाके यावेळी म्हणाले आहेत. यांच काय फक्त गुलाबी जॅकेट घातलं की यांना वाटत झालं. मात्र, तसं केल्याने काही होत नसत. मुख्यमंत्री होण तर सोडच असंही हाके यावेळी म्हणाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी यावेळी यांच्या काकाल दोन अडीच जिल्ह्याच्या बाहेर जाता आलं नाही तर यांना काय जमणार असं म्हणत शरद पवारांनाही टोला लगावला आहे.
दोन दिवसांपूर्वी काय म्हणाले होते हाके?
मला रोज महाराष्ट्रातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे धमक्या मिळू लागल्या असून मी गावगाड्यातील मेंढपाळाचा पोरगा आहे मी अशा धमक्यांना भी घालत नाही मात्र माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी त्यास पवार कुटुंबीय अजित पवार आणि रोहित पवार जबाबदार असतील असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
मी गोरगरीब ओबीसी समाजासाठी आणि त्यांच्या हक्क अधिकारांसाठी लढत असून अर्थ खात्याला गोचीडासारखा चिटकून बसलेला अजित पवार हा ओबीसी समाजाचा निधी देत नसल्याने माझा त्यांच्याशी वाद आहे. मात्र, ओबीसी समाजाचा अडवलेला निधी देण्याऐवजी राष्ट्रवादीचे पदाधिकारी नागपूरपासून पंढरपूरपर्यंत ज्या पद्धतीने धमक्या देऊ लागली आहेत ते पाहता माझ्यावर हल्ला झाल्यास या संपूर्ण पवार कुटुंब जबाबदार असेल असा इशारा हाके यांनी दिला आहे.


 
                            





 
		


 
                         
                        